संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
ॲग्रोमनी

शेतकऱ्यांना कमी दराने करावी लागतेय डाळिंब विक्री

Abhijeet Dake
सांगली ः सध्या बाजारात अर्ली मृग हंगाम घेतलेली डाळिंब बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागली आहेत. बाजार समितीत डाळिंबाला सरासरी ३० रुपये प्रतिकिलो रुपये मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले आहे. 
 
जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्‍टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. सर्वाधिक क्षेत्र आटपाडी तालुक्‍यात आहे. दुष्काळी पट्ट्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाटी तालुक्‍यात यंदा पाण्याची भीषण टंचाई होती.
 
पाणीटंचाईवर मात करून या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणी देऊन डाळिंबाचा अर्ली मृग बहारातील उत्पादन घेतले. या हंगामात डाळिंबाला अपेक्षित दर मिळेल, अशी आशा होती. जिल्ह्यात डाळिंबाचे दर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सरासरी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो असेच राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात डाळिंबाची विक्री करावी लागली आहे.
 
विष्णूअण्णापाटील फळ मार्केटमध्ये डाळिंब आवक (आवक - डझन, दर- प्रतिदहा किलो)
 
तारीख आवक. किमान दर कमाल दर सरासरी दर
18 सप्टेंबर 19086 50 500 300
27 सप्टेंबर 10473 200 500 .400
5 ऑक्‍टोबर 1770 200 400 300
6 ऑक्‍टोबर 4500 200 400 300
7 ऑक्‍टोबर 16490 .200 500 400
9 ऑक्‍टोबर. 10565 200 500 300
11 ऑक्‍टोबर 8870 100 400 300

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT