नवी दिल्ली ः अनियमित पाऊस त्यात पीक क्षेत्र कमी झाल्याने कर्नाटकातील खरीप हंगामातील कांदा उत्पादन साठ टक्क्यांनी घटण्याची शक्यता अाहे.
गेल्या वर्षी राज्यात खरिपातून १३ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनात ४,४९,०००-४,९४,००० टनांपर्यंत घट होईल, अशी माहिती राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन अाणि विकास फेडरेशनचे सहायक संचालक ए. के. सिंग यांनी दिली अाहे.
यंदा राज्यात खरिपात ४४,९२२ हेक्टरवर कांदा लागवड झाली. गेल्या वर्षी खरीप हंगामात १,०८,०८१ हेक्टरवर लागवड झाली होती. गेल्या वर्षी राज्यात प्रतिहेक्टरी १२-१२.२ टन कांदा उत्पादन मिळाले होते. यंदा ते प्रतिहेक्टरी १०-११ टनांपर्यंत खाली येऊ शकते, असेही सिंग यांनी म्हटले अाहे.
कांदा लागवडीच्या दिवसांत दर प्रतिक्विंटल ३००-४०० रुपये एवढे दर कमी होते. त्यामुळे शेतकरी कांदा पिकांकडून अन्य पिकांकडे वळले आहेत.
खरीप हंगामातील कांदा लागवडीच्या काळात कर्नाटकात दर कमी होता. यामुळे येथील शेतकरी कांदा पिकांकडून अन्य किफायतशीर दर मिळणाऱ्या पिकाकडे वळले अाहेत. परिणामी, कांदा पीक क्षेत्रात घट झाली अाहे. अनियमित पावसाचाही फटका पिकाला बसला अाहे.
- ए. के. सिंग, सहायक संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन अाणि विकास फेडरेशन