खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना अल्प लाभ  Edible oil import duty The deductions benefit the customers a little
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना अल्प लाभ  Edible oil import duty The deductions benefit the customers a little 
ॲग्रोमनी

खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना अल्प लाभ 

टीम अॅग्रोवन

पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात कपात केली आहे. तसेच उद्योगातील घटकांना खाद्यतेल आणि तेलबिया साठ्याची माहिती देण्यास सांगितले आहे. मात्र या निर्णयाचा ग्राहकांना फार मोठा लाभ होताना दिसत नाही. सरकारच्या अपेक्षेपेक्षा कमीच लाभ ग्राहकांना होताना दिसत आहे.  देशाला आवश्यक असलेल्या एकूण खाद्यतेलापैकी तब्बल ६५ ते ७० टक्के तेल आयात करावे लागते. त्यामुळे आपोआप आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा देशांतर्गत दरावर थेट परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर हे वरच्या पातळीवर कायम आहेत. त्यामुळे देशातही ग्राहकांना खाद्यतेलासाठी जास्त पैसा मोजावा लागत आहे. सरकारने आयात शुल्क कमी केले असले तरी वाढत्या दरामुळे त्याचा थेट फायदा ग्राहकांना होताना दिसत नाही.  जुलै महिन्यात खाद्यतेल आयात कमी झाली होती. परंतु देशांतर्गत स्रोतांपासून तेलनिर्मितीही वाढली नव्हती, त्यामुळे ऑगस्ट महिन्यात खाद्य तेल बाजार वरच्या पातळीवर होते. ऑगस्ट महिन्यात आयात वाढली परंतु देशांतर्गत निर्मिती कमजोर राहिली, त्यामुळे सप्टेंबर महिन्यातही दरात विशेष फरक पडला नाही. 

आठ खाद्यतेलांच्या किमतीत घसरण : केंद्राचा दावा  सरकारने खाद्यतेलांची साठेबाजी कमी करण्यासाठी आणि पुरवठा वाढविण्यासाठी विविध साठ्यांची माहिती मागविणे, आयात शुल्कात कपात करणे आदी उपाय केल्याने आठ प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मागील आठवड्यात १४ सप्टेंबरपर्यंत शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, पाम, नारळ, तीळ आणि वनस्पती तेलाच्या घाऊक किमतीत कपात झाल्याचे सरकारने म्हटले आहे. खाद्य तेलांचे दर कमी होत असले तरी अद्यापही मागील वर्षीच्या तुलनेत अधिकच आहेत.  ग्राहक कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पामतेलाच्या घाऊक किमतीत १४ सप्टेंबरपर्यंत प्रतिटन १२ हजार ६६६ रुपयांवरून २.५० टक्के घसरण होऊन १२ हजार ३४९ रुपये प्रति टनांवर आले आहेत. तर तीळ तेलाची किंमत २.०८ टक्यांनी कमी होऊन प्रतिटन २३ हजार ५०० रुपये, नारळ तेलाची किंमत १.७२ टक्क्यांनी कमी होऊन १७ हजार १०० रुपये प्रती टन झाली आहे. तसेच सूर्यफुलाचे दर १.३० टक्क्यांनी कमी होऊन १५ हजार ९६५ रुपयांवर आले आहेत. तर शेंगदाणा तेलाचे दर १.३८ टक्क्यांनी कमी होऊन १६ हजार ८३९ रुपये, आणि मोहरीचे तेल १ टक्क्याने कमी होऊन १५ हजार ५७३ रुपये तर वनस्पती तेलाचे दर १२ हजार ५०८ रुपये प्रति टन झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT