दिनबंधू महापात्रा
दिनबंधू महापात्रा  
ॲग्रोमनी

ग्राहकांच्या दारात सेवा देण्याची बॅंकांवर वेळ ः दिनबंधू महापात्रा

टीम अॅग्रोवन

पुणे : भविष्यातील बॅंकिंग पूर्णतः ग्राहक केंद्रित राहण्याची शक्यता असल्यामुळे बॅंकांना ग्राहकांच्या दारात जाऊन सेवा देण्याची वेळ आली आहे. देशात सर्वप्रथम बॅंक ऑफ इंडियाने ही संकल्पना अमलात आणून काही श्रेणीतील ग्राहकांच्या दारात जाऊन विविध सेवा देणे सुरू केले आहे, अशी माहिती बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक दिनबंधू महापात्रा यांनी दिली.  पुण्यात बॅंक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या रिटेल अॅग्री एक्स्पोचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. श्री. महापात्रा यांनी बॅंकेच्या काही निवडक खातेदारांशी या वेळी संवाद साधला. ‘‘ग्राहकांना त्यांच्या दारात सेवा देण्यासाठी ‘घर घर दस्तक’ ही संकल्पना चार महिन्यांपासून देशभर राबविली जात आहे. ग्राहकांची अपेक्षा जाणून घेत कामकाज करण्याची मध्यवर्ती संकल्पना यात आहे,’’ असे ते म्हणाले.  बॅंक ऑफ इंडियाने ग्राहक आणि कर्मचारी यांच्या अनोख्या समन्वयाच्या बळावर देशभर शाखांचे जाळे उघडल्यानंतर विदेशातदेखील २४ केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे जगात प्रत्येक क्षणाला कुठेतरी या बॅंकेच्या शाखेत व्यवहारात होत असतो. बॅंकिंग उद्योगात सूर्यास्त न पाहणारी बॅंक असा लौकिक त्यामुळेच आम्ही मिळवला आहे, असेही श्री. महापात्रा यांनी नमूद केले.  रिटेल अॅग्री एक्स्पोत मांडलेल्या कक्षाला भेट देऊन सुवर्ण तारण योजना व कृषिविषयक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. बॅंकेकडून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. किसान समाधान कार्ड तसेच स्टार भूमिहीन किसान कार्डदेखील वितरित केले जाते. कृषिपूरक उद्योगांच्या अर्थसाह्यासाठी बॅंकेने विविध उपक्रम हाती घेतल्याचे या वेळी सांगण्यात आले. बॅंकेचे महाव्यवस्थापक अजयकुमार साहू, आर. एस. चौहान, टी. सुधाकर, स्वरूपदास गुप्ता, परशुराम पांडा, अरुण जैन, कृषी अर्थ विभागाचे महाप्रबंधक रवीकुमार, पुण्याचे विभागीय प्रबंधक के. एस. एम. शास्त्री, वसुली विभागाचे मुख्य व्यवस्थापक बी. व्ही. काकडे या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT