sugar
sugar  
ॲग्रोमनी

साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार करा

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किंमत धोरण ठरविण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. त्यानुसार घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर ठरविण्यासाठी सूत्र तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने अन्न मंत्रालयाला केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.   साखरेच्या दुहेरी दर धोरणात औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचे दर जास्त असतील तर घरगुती वापरासाठीचे दर कमी असतील. यामुळे संकटातील साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देऊ शकत नाहीत.  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, की साखरेच्या दुहेरी दर धोरणामुळे बॅंकांकडे साखर गहाण ठेवून त्यावर व्याज देण्यापासून कारखान्यांची सुटका होण्यास मदत होईल. ६० ते ७० टक्के साखर जर जास्त दराने विकली तरी कारखान्यांची कॅश फ्लो वाढून त्यांना बॅंकांकडे जाण्याची गरज पडणार नाही. कारखाने स्वतः त्यांचा निधी उभारू शकतील.  साखरेच्या एकूण वापरापैकी आइक्रिम उत्पादन, शीतपेय उत्पादक आणि अन्न प्रक्रिया उद्योगात ६५ टक्के साखर वापरली जाते. या उद्योगांना जास्त दराने साखर विक्री केल्यास सामान्य ग्राहकांना झळ न बसताही कारखान्यांची वित्तीय स्थिती सुधारू शकते.  ‘‘साखरेचे दुहेरी दर धोरण ही संकल्पना ऐकायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि परीक्षण करताना मोठी जटीलता निर्माण होईल. व्यापाऱ्यांनी घरगुती वापराच्या दराने साखर खरेदी करून औद्योगिक दराने विकल्यास तेव्हा तुम्ही काय करणार,’’ असे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.  काय आहे धोरण साखरेच्या दुहेरी दर धोरणात घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर असतील. औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचे दर जास्त असतील तर घरगुती वापरासाठीचे दर कमी असतील. या धोरणामुळे औद्योगिक क्षेत्रातून वाढणाऱ्या साखरेच्या मागणीमुळे संकटात सापडणाऱ्या साखर कारखान्यांना दिलासा मिळेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT