तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा कब्जा; भारताला धक्का
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा कब्जा; भारताला धक्का 
ॲग्रोमनी

तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा कब्जा; भारताला धक्का

वृत्तसेवा

नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता निर्यातदार झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताला नवा स्पर्धक निर्माण झाला आहे. जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार देश असा बहुमान मिरविणाऱ्या भारतासमोर सध्या चीनने मोठे आव्हान निर्माण केले आहे. आफ्रिकेतील तांदळाच्या बाजारपेठेतील भारताचा दबदबा मोडून काढत चीनने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील ‘उद्योग भवना’तील धोरणकर्त्यांपासून ते तांदळाची निर्यात करणाऱ्या बड्या मिल मालकांपर्यंत सर्वांचेच धाबे दणाणले आहे. चीनकडून आतापर्यंत तांदळाची मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. मात्र चीनने आपल्याकडील पांढऱ्या तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा पहिला फटका भारताला बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील निर्यात विभागातील (कृषी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  सरकारी मालकीच्या गोदामांमधून चीनने मागील सहा महिन्यांत ३० दशलक्ष टन एवढ्या मोठ्या प्रमाणात पांढरा तांदूळ निर्यातीसाठी बाहेर काढला आहे. या तांदळाची मुख्यत्वे आफ्रिकेतील देशांना निर्यात केली जाणार आहे.  साधारणपणे ४०० डॉलर प्रतिटन दराने भारत बिगर-बासमती तांदळाची निर्यात करतो. मात्र यापेक्षा कमी दराने चीनकडून तांदळाची निर्यात केली जात आहे, अशी माहिती उत्तराखंडातील मोठे तांदूळ निर्यातदार असलेल्या लक्ष्य अगरवाल यांनी दिली. चीनकडून निर्यात होणाऱ्या बिगर-बासमती तांदळाचा दर ३०० ते ३२० डॉलर प्रतिटन आहे, असे बाजारपेठेतील सूत्रांनी  सांगितले. चीनमध्ये नव्या तांदळाला अधिक पसंती सामान्यतः चिनी नागरिक नव्या तांदळाला त्याच्या चवीमुळे अधिक पसंती देतात. त्यामुळे चीनमध्ये कायम नव्या तांदळाला मागणी असते. परिणामी, नवा तांदूळ ज्या वेळी बाजारात मोठ्या प्रमाणात येतो, तेव्हा चीन सरकारी गोदामांमधील जुना तांदूळ अतिशय कमी दराने बाजारात आणतो. हा जुना तांदूळ चीनकडून आफ्रिकेला पाठविला जातो. भारत सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार आहे. चीनच्या या उद्योगांचा पहिला फटका जागतिक बाजारपेठेबरोबरच भारताला बसतो आहे, अशी माहिती ‘अपेडा’तील सूत्रांनी दिली. सर्वांत मोठे निर्यातदार देश :   भारत, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान

भारताची निर्यात (रुपयांत)

  • २०१८  :   १४,०५९.५१ कोटी 
  • २०१९  :   ९,०२८.३४ कोटी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

    Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

    Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

    Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

    Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

    SCROLL FOR NEXT