संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या बाजाराला आधार
संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या बाजाराला आधार 
ॲग्रोमनी

संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या बाजाराला आधार

टीम अॅग्रोवन

नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी घट झाली असली तरी संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या बाजारात मोठी नरमाई आली नाही. ना शिक विभागात शनिवारी (ता. १३) रोजी ७४ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर्स पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठवडाभरात बाजारभाव प्रतिकिलो मागे ५ रु. ने नरमले. दुसरीकडे, पुणे विभागात अंड्याच्या दरात प्रतिशेकडा ७ रुपयाने वाढ दिसली.

पुण्यातील योजना पोल्ट्रीचे संचालक व थेट चिकन विक्रेते राजू भोसले म्हणाले,   की ऐन नवरात्रात खपात ४० टक्क्यांपर्यंत घट दिसत आहे. तरीही बाजारभाव फारसे घटले नाही. सध्या चिकनच्या खपात ट्रेंड बदलत आहे. उपवासाच्या सण उत्सवात चिकनचे दर खाली गेले की खरेदी वाढते. दुसरी गोष्ट, पूर्वी फक्त रविवारीच   ग्राहकांची मोठी गर्दी दिसायची. अलीकडे, बुधवार आणि शुक्रवारीही ग्राहकांची वर्दळ दिसते. त्यामुळे चिकनकडे ग्राहकांचा  वाढता ओढा बाजाराला आधार देतो, असे म्हणण्यास वाव आहे. दसऱ्यानंतर ओपन इंटिग्रेटर्स, शेतकऱ्यांचा मालही बाजारात येईल. त्या वेळी तापमानात थोडीफार घट झाली तर खपवाढीला चालना मिळेल.

अंडी बाजाराबाबत श्री. भोसले म्हणाले, ‘नवरात्रात सहसा अंड्याचे दर वाढत नाही. पण, यावर्षी बाजारात थोडीफार का होईना वाढ दिसली आहे. बाजार पडण्याऐवजी स्थिर राहणे किंवा अल्पशी का होईना वाढ दिसते, ही अंड्याच्या बाजारासंदर्भात अपवादात्मक बाब आहे. येथेही वाढता खप हे परिमाण आपण लावू शकताे. एकूणच पोल्ट्री उद्योगाच्या दृष्टीने ही आश्वासक बाब आहे.’ कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की नवरात्र काळात मागणी घटल्यामुळे मागील आठवड्यात महाराष्ट्रातील ब्रॉयलर मार्केटमध्ये नरमाई दिसली. मात्र, संबंधित कालावधीसाठी मागणीच्या तुलनेत संतुलित पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्यामुळे बाजारभावात फारशी पडझड झाली नाही.

किंबहूना शनिवारी (ता. १३) लिफ्टिंग दर ७५ रु. प्रतिकिलो दरम्यान होता. थोड्या फार फरकाने का होईना बाजारभाव उत्पादन खर्चाच्या वर आहे, ही जमेची बाजू होय. यापुढील काळात साधारणपणे दसऱ्यानंतर खपात वाढ होईल, पर्यायाने बाजारभाव उंचावण्यास हातभार लागेल. दक्षिण भारातातील बाजारभाव किफायती पातळ्यांवर आहे. बंगळूर आणि हैदराबादेतील लिफ्टिंग दर ७७ ते ७८ रु. प्रतिकिलोच्या दरम्यान आहे. संतुलित पुरवठ्याच्या नियोजनामुळे पुढच्या आठवड्यात बाजारभाव नक्की वाढेल. एकूण देशातील ब्रॉयलर बाजारभावाच्या दृष्टीने आशायदाक चित्र दिसतेय.

ऑक्टोबर हिटमुळे बाजाराला आधार ब्रॉयलर पोल्ट्री विभागात वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे वजन वाढत नाही. खासकरून मालेगावसारख्या विभागात ३५ अंशापुढे तापमानाचा पारा पोचला आहे. याशिवाय, पुणे व नाशिक अनुक्रमे ३४ अंशावर पोचले आहे. अलिबाग येथेही ३२ अंशावर पारा सरकला आहे. यामुळे उत्पादन नियंत्रित होण्यास मदत मिळाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT