लातूरला ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक
लातूरला ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक 
ॲग्रोमनी

लातूरला ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक

सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ही आवक तीस हजार क्विंटलची आहे. सोयाबीनसाठी शासनाचा हमीभाव क्विंटलला तीन हजार ५० रुपये आहे. असे असताना येथील बाजारात मात्र सर्वसाधारणपणे दोन हजार पाचशे रुपये या दराने सोयाबीनची खरेदी केली जाते. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. खऱीप हंगामात सुरवातीच्या काळात कमी पाऊस झाला; पण नंतर मात्र चांगला पाऊस झाल्याने या वर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात तीन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनला उताराही चांगला आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनचे भाव पडलेलेच होते.  त्यामुळे शेतकऱ्य़ांनी बाजारात सोयाबीन आणले नाही. त्यात दिवाळीत पाच सहा दिवस अडत बाजार बंदच राहिला. सोमवारी हा बाजार सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या अडत बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट यार्डात सोयाबीनने भरलेल्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे. मंगळवारी या बाजारात सोयाबीनची तीस हजार क्विंटलची आवक राहिली आहे. यात जास्तीचा भाव दोन हजार ८२५ रुपये होता. तर कमी भाव दोन हजार ४०० रुपये राहिला. सर्वसाधारण भाव हा दोन हजार ६६० रुपये प्रतिक्विंटलला आहे. शासनाने सोयाबीनसाठी तीन हजार ५० रुपये प्रतिक्विंटलला हमीभाव जाहीर केला आहे; पण हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची व्यापाऱ्य़ांकडून खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT