Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंडच्या दरात चांगली वाढ

Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा होत आहे. पण देशातील बाजारातील भावपातळी मात्र कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात सुधारणा झाल्याचा आधार सोयातेलाला मिळत आहे.

Team Agrowon

अनिल जाधव
Soybean Market Rate : पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा होत आहे. पण देशातील बाजारातील भावपातळी मात्र कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात सुधारणा झाल्याचा आधार सोयातेलाला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी टिकून राहील्यास देशातील भावपातळीही वाढू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

अमेरिकेतील सोयाबीन पिकाला उष्णतेचा फटका बसत आहे. येथील पिकाची स्थिती सरासरी असल्याचं सांगितलं जातं. येथील कृषी विभागाच्या मते चांगल्या स्थितीतील पिकाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात सुधारणा दिसून आली. पण ब्राझीलमधून आंतरराष्ट्रीय बाजारात येणाऱ्या सोयाबीनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दरवाढीवर काहीसा दबाव असल्याचे जाणकारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात चांगली सुधारणा पाहयाला मिळाली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १४.३१ डाॅलरवर होते. आज दिवसभर सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु होते. सोयापेंडनेही ४२२ डाॅलरचा टप्पा गाठला होता. सोयापेंडच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोयातेलाच्या भावानेही ६३.३० सेंट प्रतिपाऊंडची पातळी गाठली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तेलाच्या दरात सुधारणा दिसू येत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये शेतीमाल निर्यातीच्या मुद्द्यावरून पुन्हा मतभेद दिसून आले. यामुळे युक्रेनमधून निर्यात सुरु ठेवण्यास रशियाने नकार दिला. परिणामी निर्यात पुन्हा बंद झाली. याचा परिणाम सूर्यफुल तेलाच्या दरावर दिसून आला. तर दुसरीकडे पामतेलाचे भाव मागील पाच महिन्यांतील उचांकी पातळीवर आहेत. परिणामी सोयातेलाच्या भावाला चांगला आधार आहे.

देशात मात्र सोयाबीनचे भाव आजही ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान राहीले. देशात सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा चांगला स्टाॅक असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत आहे. सध्या बाजारातील सोयाबीन आवक सरासरीपेक्षा जास्तच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्यास बाजारातील आवक पुन्हा वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातील वाढ कायम राहिल्यास देशातील दरालाही आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Farmer Crisis: शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटलमागे २ हजारांचे नुकसान, सोयाबीनला ६ हजार भाव कधी मिळणार?; काँग्रेसचा सवाल

Ahilyanagar News: कोरोना काळात चुकीचे उपचार केल्याने मृत्यू, पाच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Agriculture Mulching: शेतीमध्ये आच्छादनाचा वापर करुन थांबवा मातीची धूप

Agrowon Diwali Article: शेती सुखाची करणे शक्य आहे का?

Black Diwali: शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्याने काळी दिवाळी साजरी

SCROLL FOR NEXT