Soybean Market  Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : आठवडाभरात सोयाबीन दरात २०० ते ३०० रुपयांची सुधारणा

सोयापेंडच्या वायद्यांमध्येही चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे दरानं ज्या वेगानं पूर्वपातळी गाठली. त्यावेगानं सोयापेंडचे दर सुधारले नाही. सोयापेंड आजही ४६२ डाॅलर प्रतिटनावर होते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयापेंडचे वायदे ४९८ डाॅलरवर होते.

Anil Jadhao 

Soybean Rate Update : देशातील बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. मागील आठवडाभरात सोयाबीन दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची सुधारणा पाहाला मिळाली.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर काहीसे स्थिरावले आहेत. पण कच्चा इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे खाद्यतेलासह सोयातेल बाजारालाही आधार मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर पूर्वपातळीवर पोचले. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे दरही पडले होते. पण मागील आठवड्यात दरात पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली.

आज सायंकाळपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.२० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. सोयाबीनने १५.२५ डाॅलरचा टप्पा गाठल्यानंतर दरात काहीसे चढ उतार येत आहेत.

मागील दोन दिवसांपासून दर या पातळीच्या पुढे टिकत नाहीत. पण दरात घट होण्याची शक्यता कमीच आहे, असे जाणकारांनी सांगितले.

वायद्यांमध्ये चढ उतार

सोयापेंडच्या वायद्यांमध्येही चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे दरानं ज्या वेगानं पूर्वपातळी गाठली. त्यावेगानं सोयापेंडचे दर सुधारले नाही. सोयापेंड आजही ४६२ डाॅलर प्रतिटनावर होते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयापेंडचे वायदे ४९८ डाॅलरवर होते.

२३ मार्च रोजी सोयापेंड वायद्यांनी चालू हंगामातील सर्वात कमी ४३७ डाॅलरचा टप्पा गाठला होता. आता दरात सुधारणा झाली. मात्र दरपातळी अद्यापही कमीच आहे.

सोयातेल सुधारले

सोयातेलाच्या दरात मात्र सुधारणा पाहायला मिळाली. सोयातेलाचे वायदे ५७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कच्च्या इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाली. सर्वच खाद्यतेलाचे दर सुधारले आहेत. सोयातेलाचे दरात आणखी सुधारणा झाल्यास सोयाबीनला आधार मिळेल.

बाजाराची स्थिती

सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांचा दर मिळतोय. दुसरीकडे बाजारातील आवकही अधिक आहे.

पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये सोयाबीनची बाजारातील आवक कमी होऊ शकते. त्यातच सोयाबीनला मागणी चांगली आहे. त्यामुळे दरात सुधरणा झाली. भारतीय सोयापेंडला मागणी कायम राहील.

शेजारच्या देशांना भारतीय सोयापेंड आयात फायदेशीर ठरते. त्यामुळे निर्यात यंदा दुप्पट झाली. परिणामी सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होईल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT