Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market: सोयाबीन उत्पादकांच ऐन दिवाळीत निघतंय दिवाळ; भाव हमीभावापेक्षा ७०० रुपयांनी कमी

Soybean Rate : सोयाबीनची पूर्ण होत आलेली काढणी आणि दिवाळीमुळे राज्यात सोयाबीन आवक वाढली. पण बाजारात शेतकऱ्यांची निराशी होत आहे.

अनिल जाधव

Pune News : सोयाबीनची पूर्ण होत आलेली काढणी आणि दिवाळीमुळे राज्यात सोयाबीन आवक वाढली. पण बाजारात शेतकऱ्यांची निराशी होत आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही ५०० ते ७०० रुपयांनी कमी भाव मिळत आहे. तर दुसरीकडे हमीभाव खरेदी केंद्रांवर अजूनही खरेदीने वेग घेतलेला नाही. बारदाणाचा तुटवडा आणि रखडत चालेली प्रक्रिया यामुळे अपेक्षेप्रमाणे खेरदी होताना दिसत नाही.

बाजारात सोयाबीनची आवक शिगेला पोचली. त्यामुळे भावावर आणखी दबाव आला. सध्या गुणवत्तापूर्ण सोयाबीन ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. तर ओलावा असलेले सोयाबीनला केवळ ३ हजार ८०० रुपयांपासून भाव मिळत आहे.

हा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. केंद्राने यंदा सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. पण गुणवत्तापूर्ण सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा किमान ५०० ते ७०० रुपयांनी कमी आहे. तर ओलावा जास्त असलेल्या मालाचा भाव ७०० ते ११०० हजार रुपयांनी कमी आहे.

देशात यंदा सोयाबीनची लागवड वाढली. पण पावसाने सोयाबीनला मोठा दणका दिला. नुकसान वाढल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगल्या भावाची अपेक्षा होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि देशातील बाजारातील घडामोडी यामुळे सोयाबीनचा बाजार दबावात आहेत.

सोयाबीनचा भाव दबावात असल्याने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हमीभावाने १३ लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी दिली. त्यासाठी जवळपास ५०० खरेदी केंद्रांना खेरदीची परवानगी मिळाल्याचेही पणन विभागाने स्पष्ट केले. त्यापैकी जवळपास ४०० केंद्रांवर खरेदी सुरु झाली होती. पण ही खरेदी केंद्रे नेमकी कोणत्या ठिकाणी आहेत. आपला माल कधी खरेदी होईल, याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही.

शेतकरी नाराज

खरेदी केंद्रांवर सर्व काही आलबेल सुरु असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. सरकारने केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन खरेदीला परवानगी दिली. शेतकऱ्यांना खूश करण्यासाठीच हमीभाव खरेदीचा डाव खेळला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या हमीभाव खेरदीचा अजूनही फायदा होताना दिसत नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

हमीभावाने खरेदी आवश्यक

यंदा सोयाबीन मंदीत आहे. त्यामुळे सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करणे आवश्यक आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली तरच खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव सुधाऱण्यास मदत होईल. अन्यथा शेतकऱ्यांवर कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ येऊ शकते. सरकारने हमीभावाने खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण करावे, अशी मागणी सध्या केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Inputs : निविष्ठा खरेदीप्रकरणी आयुक्तालयाकडून नोटिसा

Diwali Festival : ओतूर येथे बळीराजाची मिरवणूक

Animal Husbandry Department : ‘पशुसंवर्धन’च्या पुनर्रचेनतून आरोग्यसेवांचा दर्जा उंचावेल

Sericulture : बारामतीत उभारतेय कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र

Cotton Production : भारताची कापूस उत्पादकतेत उतरंडी

SCROLL FOR NEXT