Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : अकोल्यात हरभरा ५०६५ रुपये

Chana Rate : शासनाकडून हमीभावाने हरभरा खरेदी केली जात असून खुल्या बाजारातही हरभऱ्याच्या दरात थोडीफार सुधारणा दिसून येत आहे.

Team Agrowon

Chana Market Update Akola : शासनाकडून हमीभावाने (MSP) हरभरा खरेदी (Chana Procurement) केली जात असून खुल्या बाजारातही हरभऱ्याच्या दरात (Chana Rate) थोडीफार सुधारणा दिसून येत आहे.

अकोला बाजार समितीत सोमवारी (ता. ३) हरभऱ्याचा कमाल दर ५०६५ रुपये होता. सरासरी ४७०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा विक्री झाला.

गेल्या काही दिवसांपासून रब्बीतील नवीन हरभऱ्याची बाजारात आवक वाढलेली आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारांमध्ये हरभरा अवघा चार ते साडेचार हजारांदरम्यान विक्री झाला.

शासकीय हमीभाव खरेदी सुरू झाल्यानंतर मात्र थोडाफार दर सुधारला. आता चांगल्या दर्जाचा हरभरा ५००० रुपयांपर्यंत विकला जात आहे. हरभऱ्याचा किमान दर आजही ४००० रुपयांपासून मिळत आहे.

सोमवारी किमान ४०५० ते कमाल ५०६५ रुपयांदरम्यान हरभऱ्याची विक्री झाली. सुमारे १९३१ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. शासकीय हमीभाव केंद्रावर सध्या हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

मात्र, दुसरीकडे बाजार समित्यांमध्येही आवकेवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. बहुसंख्य शेतकरी हरभरा विक्रीसाठी बाजार समित्यात घेऊन येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT