Silk Cocoon Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Cocoon Market : रेशीम कोषाला प्रतिकिलो ३१० ते ४९५ रुपये दर

Silk Cocoon Rate : जालना येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू झाल्यानंतर बीड येथील बाजार समितीनेही रेशीम कोष खरेदीसाठी पुढाकार घेतला होता.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Beed News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रेशीम कोष खरेदी बाजारात शुक्रवारी (ता. ५) आवक झालेल्या रेशीम कोषांना ३१० ते ४९५ रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जालना येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू झाल्यानंतर बीड येथील बाजार समितीनेही रेशीम कोष खरेदीसाठी पुढाकार घेतला होता. ६ नोव्हेंबर २०२१ पासून प्रत्यक्ष रेशीम कोष खरेदीला सुरवात करण्यात आली.

शुक्रवारी बाजारपेठेत ११ क्विंटल आणि ६३ किलो रेशीम कोषांची आवक झाली. जवळपास १७ शेतकरी रेशीम कोष घेऊन बाजारपेठेत आले होते. यामध्ये बीड, पुणे, नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश होता.

एक जूनपासून आतापर्यंत जवळपास १२ हजार ४१६ किलो म्हणजे १२४ क्विंटल १६ किलो रेशीम कोष १४३ शेतकऱ्यांनी बीड येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत आणला. त्यास साधारणतः १९० ते ५७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला. हा रेशीम कोष आणणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नांदेड, वाशीम, बीड, बारामती, नाशिक, जालना, पुणे, नगर, पालघर आदी जिल्ह्यांतील उत्पादकांचा समावेश आहे.

प्रमुख बाजारपेठ होण्याकडे वाटचाल

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अखेरपर्यंत या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत बेंगलोर, लातूर, भंडारा, जालना, पश्चिम बंगाल, रामनगर येथील जवळपास १५ व्यापारी होते. आता त्यांची संख्या जवळपास २२ पर्यंत गेल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोष घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची संख्या बीड रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत असून रेशीम कोष खरेदीची एक प्रमुख बाजारपेठ होण्याकडे बीडची वाटचाल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT