Wheat
Wheat Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

युक्रेनमध्ये पिकांची २९ टक्के काढणी पूर्ण

Mahesh Gaikwad

पुणेः युद्धाच्या झळा सोसणाऱ्या युक्रेनमध्ये पिकांच्या काढणीला (Ukraine Crop Harvesting) वेग आला आहे. आतापर्यंत २९ टक्के पिकांची काढणी पूर्ण झाल्याचे युक्रेनच्या कृषी मंत्रालयाने (Ukraine Agriculture Department) सांगितले. गहू हे युक्रेनमधील (Wheat Is A Major Crop In Ukraine) प्रमुख पीक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीखालील (Area Under wheat) क्षेत्र आणि उत्पादकता (wheat Productivity) घटली आहे.

युक्रेनमध्ये युध्दामुळे वसंत ऋतुतील पेरणी निम्म्याच क्षेत्रावर होऊ शकली. रशियन सैन्याच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात पेरा नगण्य झाला. त्यातच पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि इंधनाची तीव्र टंचाई भासली. त्यामुळे पेरणीवर परिणाम झाला. आता वसंत ऋतुतील पिकं काढणीला आली आहेत. युक्रेनमधील अनेक भागांत सध्या पीक काढणीची लगबग सुरु आहे. जून महिन्याच्या शेवटी सुरू झालेल्या काढणीने आता वेग पकडला आहे.

युक्रेनमधील शेतकऱ्यांनी २८ जुलैपर्यंत काढणीचा वेग ११ टक्क्यांनी वाढविला. पिकांची काढणी २९ टक्के पूर्ण झाली. आत्तापर्यंत ११७ लाख टन धान्य उत्पादन मिळालं. त्यामध्ये ७९ लाख टन गव्हाचा समावेश आहे. एकूण लागवडीत गव्हाचं क्षेत्र जास्त होतं. आतापर्यंत गव्हाची ४६ टक्के म्हणजेच २२ लाख हेक्टरवरील गव्हाची काढणी झाली. यंदा गव्हाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घटलं आहे. तसेच उत्पादकतेनेही मार खाल्ला आहे. यंदा गव्हाची हेक्टरी उत्पादकता ३.५ टन मिळली. मागील वर्षी उत्पादकता ४.४ टन होती.

युक्रेनमध्ये गव्हाच्या खालोखाल बार्ली पिकाची लागवड केली जाते. आतापर्यंत बार्लीची ६१ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. चालू आठवड्यात बार्लीच्या काढणी १५ टक्के वेगाने झाली. एकूण १० लाख हेक्टरमधून ३५ लाख टन बार्लीचं उत्पादन झालं. बार्लीची उत्पादकता प्रति हेक्टरी ३.५ टन मिळाली. मागील वर्षी हेक्टरी ४.३ टन उत्पादकता होती. मोहरी पिकाची काढणीही ६१ टक्के झाली. आतापर्यंत ७ लाख हेक्टरवरील पीक शेतकऱ्यांनी काढलं. त्यातून १७ लाख टन मोहरी उत्पादन मिळालं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

SCROLL FOR NEXT