कर्करोगोत्तर आहारात कोबीवर्गीय भाज्यांचा वापर आवश्‍यक ठरतो.
कर्करोगोत्तर आहारात कोबीवर्गीय भाज्यांचा वापर आवश्‍यक ठरतो.  
महिला

कर्करोगोत्तर आहारात हवे सोया पदार्थ, कोबीवर्गीय भाज्या

कोजेन्सिस वृत्तसेवा

स्तनाच्या कर्करोगासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारादरम्यानचे दुष्परिणाम (साईड इफेक्टस) कमी करण्यासाठी सोया दूध, टोफू यांसारखी सोया उत्पादने आणि कोबीवर्गीय भाज्या उपयुक्त ठरू शकत असल्याचे जॉर्जटाऊन विद्यापीठातील वैद्यकीय विभागात झालेल्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन ‘ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च अॅण्ड ट्रिटमेंट’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. स्तनाच्या कर्करोगासाठी उपचार पूर्ण झाल्यानंतर काही महिने किंवा वर्षानंतर उपचाराचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. प्रामुख्याने इस्ट्रोजन  संप्रेरकाची निर्मिती आणि वापरावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे शरीरातून उष्णता बाहेर पडणे किंवा रात्रीच्या वेळी अधिक घाम येण्यासारखे अनुभव रुग्णांना येतात. कर्करोगानंतरच्या आयुष्यामध्ये झालेले बदल मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत असतात. अशा दुष्परिणामावर आहारातील घटकांमुळे होणारे बदल तपासण्यात आले. त्यासाठी अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठामध्ये कार्यरत संशोधकांनी अमेरिकेतील १७३ स्पॅनिश व्यतिरिक्त श्वेतवर्णीय आणि १९२ चीनवंशीय महिलांतील स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेतलेल्या रुग्णांचा अभ्यास केला.

  • सामान्यतः चिनी महिलांमध्ये हे कर्करोगोत्तर त्रासदायक बदल कमी असल्याचे जाणवत होते. मात्र, त्यासाठी कोणतीही संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध नव्हती. चिनी आहारामध्ये सोया आहार आणि कोबीवर्गीय भाजीपाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे अभ्यासामध्ये चिनी महिलांचा प्रामुख्याने समावेश केला असल्याचे वरिष्ठ संशोधक ज्युडी हुयेई-यू वांग यांनी सांगितले.  
  • पूर्ववैद्यकीय अभ्यासामध्ये सोया आणि कोबीवर्गीय भाज्यांमध्ये असलेले जैविक संयुगे ही स्तनाच्या कर्करोगांच्या पेशींच्या वाढीला कारणीभूत होत असल्याचे मानले जाते. मात्र, कर्करोगाचे निदान झाल्यानंतर या घटकांचा वापर केल्यास नेमका चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले. अर्थात अधिक अभ्यास होण्याची आवश्‍यकता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
  • थोडक्यात निष्कर्ष :

  • कोबीवर्गीय भाज्या आणि सोयाबीन आधारीत विविध उत्पादनांचा अधिक वापर केल्यास रजोनिवृत्ती काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे प्रमाणही कमी होते.
  • कर्करोगावरील उपचारामध्ये इस्ट्रोजेन घटकांचे प्रमाण कमी झाल्याने अनेक समस्या उद्‌भवतात. त्यावरही या घटकांचा फायदा होऊ शकतो.
  • अधिक सोयाबीन आहारात असल्यास ताणांचे प्रमाण कमी होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT