Every effort should be made to reduce greenhouse gas emissions to prevent the process of temperature rise.
Every effort should be made to reduce greenhouse gas emissions to prevent the process of temperature rise. 
कृषी शिक्षण

तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी लागू शकतात काही दशके

वृत्तसेवा

ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्च’ येथील तीन संशोधकांनी जागतिक तापमान वाढीच्या प्रक्रियेचा वेग रोखण्यासाठी काय करता येईल, या संदर्भात अभ्यास केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रारूपानुसार राबवलेल्या बदलांचे होणारे परिणाम तपासले आहे. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’ मध्ये प्रकाशित झाले आहेत. मानवतेसमोरील आव्हानांची यादी केली तर त्यामध्ये जागतिक तापमान वाढ हे संकट फार वरच्या क्रमांकावर येईल, याबाबत शास्त्रज्ञांच्या मनामध्ये शंका नाही. औद्योगिकीकरणाने वेग घेतल्यानंतर सुरू झालेल्या या प्रक्रियेचा वेग पुढे वाढतच गेला आहे. भविष्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे अनेक वनस्पती, सजीव प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्याच प्रमाणे ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून सागरी पातळीत वाढ झाल्याने अनेक बेटे आणि किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. सामान्यतः तापमान वाढ रोखण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची कल्पना मांडली जाते. मात्र, त्या प्रक्रिया राबवूनही आपली पृथ्वी थंड करण्यास सुरुवात होण्यासही काही दशकांचा कालावधी लागू शकतो. वातावरणाचे पॅटर्न (त्याला इंग्रजीमध्ये क्लायमेंट इनर्शिया असे म्हणतात) बदलण्यासाठी अत्यंत खोलवर विश्लेषण करून या हरितगृह वायूंचे कमी करण्याचे नेमके प्रमाण ठरवावे लागणार आहे. हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण वेगवेगळ्या पातळीपर्यंत कमी केल्यानंतर होणारे परिणाम किंवा त्या उत्सर्जनाचे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांचे उपलब्ध वेगवेगळ्या वातावरणीय प्रारूपांवर या संशोधकांना काम केले आहे.

  • कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जनाच्या पातळीतील काही बदलही एकूण जागतिक तापमान वाढीवर लक्षणीय परिणाम घडवू शकतात. मात्र, त्यात प्रगती होण्यासाठी दीर्घकाळ लागू शकतो.
  • अन्य हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये अल्पशी घट झाली तरी शीतकरणाचा कल वेगवान होतो. म्हणजे या अन्य हरितगृह वायूंचे प्रमाण कमी न केल्यास पृथ्वी थंड करण्याचा वेगही कमी राहू शकतो.
  • प्रक्रियेचा वेग आणि सकारात्मक परिणाम दिसण्यास लागणारा काळ

  • जर या वर्षापासून सर्वोत्तम संभाव्य पर्याय म्हणजेच शून्य उत्सर्जन शक्य झाले तरी आपली पृथ्वी २०३३ या वर्षापर्यंत थंड झालेली असेल.
  • जर जागतिक पातळीवरील संशोधक आणि राजकारणी ज्याला शक्य मानतात, त्या RUCP२.६ पातळीपेक्षा हरितगृह वायू उत्सर्जन कमी ठेवले, तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यासाठीही २०४७ उजाडेल.
  • अंतिमतः हरितगृह वायू उत्सर्जन हे सुमारे ५ टक्के कमी करू शकलो, तर सकारात्मक परिणाम दिसण्यास २०४४ पासून सुरू होईल.
  • या गटाने केलेल्या अभ्यासामध्ये भविष्यांचे अत्यंत स्पष्ट चित्र मिळेल, हा दावा विविध मर्यादांमुळे संशोधक करत नसले तरी भविष्यासंबंधीचा एक आढावा नक्कीच मिळू शकतो.
  • संपूर्ण मानवजात म्हणून विचार आवश्यक

  • हवामान बदलाच्या समस्येच्या निराकरणासाठी लागणारा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणार आहे. आपण जितका प्रक्रियांना उशीर करू तितका निष्कर्ष दिसण्यासाठी उशीर होत जाणार आहे. या उशिराचे आर्थिक परिणामही तितकेच तीव्र असणार आहेत. भविष्यातील नेमक्या परिणामांचा आर्थिक अंदाज मांडण्यात आलेला नसल्यामुळे औद्योगिक आणि आर्थिक पातळीवर त्याचे महत्त्व अद्याप व्यवस्थित समजलेले नाही. आपल्याला संपूर्ण मानवजात म्हणून उत्सर्जनातून मिळणाऱ्या फायद्याच्या तुलनेमध्ये होणारे नुकसान यांचे नेमके संतुलन करण्याची आवश्यकता आहे.
  • कोविड १९ च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी झालेल्या दीर्घ टाळेबंदीच्या काळात कारखाने, वाहतूक संपूर्ण बंद असल्याचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले होते. अत्यंत सघन आणि वर्दळीच्या अशा शहरांमध्येही हवेचा दर्जा सुधारल्याचे चित्र दिसत होते. म्हणजेच भविष्यात उत्सर्जन व त्यातून होणारा जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी अशाच प्रकारे सर्व जग एकत्र येणे गरजेचे आहे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT