हरिभाऊ जावळे
हरिभाऊ जावळे 
कृषी शिक्षण

हरिभाऊ जावळे यांनी स्वीकारला कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार

टीम अॅग्रोवन

पुणे ः कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार आमदार हरिभाऊ जावळे यांनी कृषी परिषदेचे प्रभारी महासंचालक आर. बी. भागडे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २९) स्वीकारला. या वेळी सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय मेहता, कृषी परिषदेचे विस्तार विभागाचे संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, प्रशासन विभागाचे सहसंचालक गणेश घोरपडे आदी उपस्थित होते.  श्री. जावळे मूळचे जळगाव जिल्ह्यातील भालोद येथील रहिवासी आहेत. १९९९ मध्ये यावलमधून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर दोन वेळा खासदार झाले. तसेच २०१४ मध्ये रावेर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत.  श्री. जावळे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शेती व व्यवसाय केला. शेती करत असताना खताच्या व्यवसायाला सुरवात केली. सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी शेतकऱ्यांचे सेमिनार आणि मेळावे आयोजित केले. केळी आणि केळी पिकावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग यावर अभ्यासासाठी केळी संशोधन केंद्र त्रिची, मैसूर आणि नवसारी विद्यापीठ येथे प्रशिक्षण घेतले.  शेती-सहकाराचा दांडगा अभ्यास असलेला ग्रामीण भागातील विश्वासू चेहरा म्हणून ओळख जाते. केळी खोडावर प्रक्रिया करून त्याद्वारे सेंद्रिय द्रव्य खते (टाकाऊपासून टिकाऊ या धर्तीवर) भारतातील पहिला प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प उभा केला. इंधनात बचत होऊन उत्पादन खर्च कमी व्हावा, या उद्देशाने स्पेंटवॉशपासून बायोगॅसनिर्मितीचा प्रकल्प उभारला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT