University exams Agrowon
कृषी शिक्षण

कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

प्रवेश यादी ११ ऑक्टोबरला जाहीर होणार.

Team Agrowon

कृषी अभ्यासक्रमाच्या (Agriculture Course) प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून, पहिल्या प्रवेशाची यादी ११ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार प्रवेश पूण करावेत, अशी माहिती सीईटी सेलचे (CET Cell) आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

कृषी अभ्यासक्रमाच्या नऊ शाखांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत ५ ते २० ऑगस्टदरम्यान एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल १५ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. त्यानुसार सीईटी सेलकडून बी.एस्सी. ॲग्रिकल्चर, बी.एस्सी (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी (फॉरेस्ट्री), बी.एफ.एस्सी (फिशरी), बी.टेक (फूड टेक्नोलॉजी), बी.टेक. (बायो टेक्नोलॉजी), बी.टेक. (अ‍ॅग्रिकल्चर इंजिनियरिंग), बी.एस्सी. कम्युनिटी सायन्स, बी.एस्सी. अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट या नऊ शाखांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

१९३ महाविद्यालयांमध्ये १६ हजार, ६२६ जागा उपलब्ध असून, १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहे.

अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑक्टोबरला जाहीर होणार असून, पहिल्या प्रवेश फेरीची यादी ११ ऑक्टोबर, दुसरी प्रवेश पेरी १८ ऑक्टोबर तर केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी ४ ते ११ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dr. Homi Cherian: सेंद्रिय मसाला पीक उत्पादनाला प्रोत्साहन

Fake Success Story: फसव्या यशकथांचा सापळा

Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण

Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

SCROLL FOR NEXT