Mango Crop Management Agrowon
कृषी सल्ला

Mango Crop Management : आंबा बागेत फुलकीड, भुरी रोगाचा प्रादुर्भाव का होतो?

सध्या आंबा बागा फुलोरा ते फळधारणेच्या अवस्थेत आहेत. कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत आहे. असे हवामान फुलकिडींच्या म्हणजेच थ्रीप्सच्या वाढीसाठी पोषक असते. या किडीचा प्रादुर्भाव आंबा मोहर आणि फळांवर होऊ शकतो.

Team Agrowon

सध्या आंबा बागा फुलोरा ते फळधारणेच्या अवस्थेत आहेत.  कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत आहे.

असे हवामान फुलकिडींच्या (Thrips) म्हणजेच थ्रीप्सच्या वाढीसाठी पोषक असते. या किडीचा प्रादुर्भाव आंबा मोहर आणि फळांवर होऊ शकतो.

तसेच रात्रीचे तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत असल्यास असे तापमान भुरी (Powdery Mildew) रोगाच्या वाढीसाठी पोषक असते.

फुलकीड आणि भुरी रोगाचं नियंत्रण कसं कराव? याविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

फुलकीडे कोवळ्या सालीचा भाग खरवडत असल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात व मोहर काळा पडून गळून जातो.

फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळाची साल खरवडल्यासारखी दिसते. फळांवर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात. लहान फळांची गळ होते.


फुलकिडीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास ८ ते ९ दिवसांनी दुसरी फवारणी थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी.

या किडीचा संपूर्ण जीवनक्रम १५ दिवसांमध्ये पूर्ण होत असल्याने नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते.

तिसऱ्या टप्प्यातील मोहर आणि नुकतीच फळधारणा झालेल्या आंबा पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.

भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT