Team Agrowon
पाचरीच्या आकाराचे दिसणारे, ४ मिलीमीटर लांबीचे तुडतूडे अतिशय चपळ असतात.
किड आपल्या शरीरातू चिकट पदार्थ बाहेर टाकते, हा पदार्थ पानावर, लहान फळावर पडून तेथे कॅपनोडीयम या काळपट बुरशीची वाढ होऊन झाडाची अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते.
रंग आंबा खोडाच्या रंगाशी मिळताजुळता असून डोक्यावर तपकिरी ठिपके असतात.
किडीची मादी हिवाळ्यात फुले व कोवळी पाने यांच्या शिरात, देठात अंडी घालतात. यातून ५-६ दिवसात पिवळसर, काळपट पिले बाहेर पडून कोवळ्या पानातील आणि मोहरातील रस शोषण करतात.यामुळे पाने वेडी वाकडी होतात.
झाडावर मोहर यायला लागल्यावर तुडतूडे गंभीर परिणाम करतात.
बागेत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील याची काळजी घेतल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.