कृषी सल्ला (राहुरी विभाग) 
कृषी सल्ला

कृषी सल्ला (राहुरी विभाग)

वाढत्या थंडीमध्ये करावयाचे पीक व जनावरांचे व्यवस्थापन

कृषी विद्या विभाग, राहुरी

गहू फुटवे फुटण्याची अवस्था     खोडमाशीकरिता ढगाळ हवामान पोषक असते. खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी,      निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १.५ मि.लि.     गरजेप्रमाणे १ ते २ फवारण्या कराव्यात.     जास्त पाणी दिल्यास शेतात सतत ओलावा टिकून राहतो. अति ओलाव्यामुळे रोगाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन पिकाच्या गरजेनुसारच पाणी द्यावे.     शिफारस केल्याप्रमाणेच रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. युरिया खताचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात वापर केल्यास तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.     पिकांवर तांबेरा दिसू लागताच, फवारणी - मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी     गरजेनुसार दुसरी फवारणी फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने करावी.     मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच, फवारणी प्रति लिटर पाणी  जैविक कीटकनाशक - मेटाऱ्हायझीम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम. (ही फवारणी संध्याकाळी करावी.) किंवा २) रासायनिक फवारणी - थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रिड (२० एसपी) ०.५ ग्रॅम.     १० ते १५ दिवसांचे अंतराने अंतराने गरजेप्रमाणे १ ते २ फवारण्या कराव्यात.

मका     अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी     इमामेक्टिन बेंझोएट (५%) ०.४ ग्रॅम.

ऊस     पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच, व्हर्टिसिलीयम लेकॅनी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे  संध्याकाळी फवारणी करावी.   लसूण घास     लसूण घासावर मावा व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणाकरिता मेटाऱ्हायझीम ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

जनावरांची हिवाळ्यात घ्यावयाची काळजी     सध्याच्या थंडीपासून लहान करडे, कोकरे, वासरे यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायला आलेल्या जनावरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनावरांच्या गोठ्यांना बारदान, शेडनेटचे पडदे लावावेत. तसेच गोठ्यामधील उष्णतामान टिकून राहण्यासाठी ५०० ते १००० वॉटचे बल्ब गोठ्यामध्ये कमी उंचीवर लावावेत. शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी.      गाभण जनावरांना व छोट्या जनावरांना रात्रीच्या वेळी वाळलेले गवत, कडबा किंवा गोणपाट यांची बिछायत टाकावी.      गोठा कोरडा राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी. त्यासाठी दर ८ ते १० दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा.      थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जनावरांच्या अंगावर गोणपाट बांधावे.      विशेषत: गाभण गायी-म्हशींची जास्त काळजी घ्यावी. जनावरांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जनावरांच्या आहारात शेंगदाणा पेंड किंवा सरकी पेंड यांचा वापर वाढवावा. शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनयुक्त आहार द्यावा. क्षार व जीवनसत्त्वांचे मिश्रण वाढवावे. सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा.      चराऊ जनावरांना चरण्यासाठी नेताना सकाळी उशिरा न्यावे. गवतावर दहिवर कमी झालेले असेल. गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत.      सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जनावरांच्या नाकाभोवती टरपेंटाईनचा बोळा फिरवावा. सर्दीचा रंग हिरवट-पिवळसर असल्यास तातडीने पशुवैद्यकाच्या सल्ला घ्यावा.      जनावरांचे पिण्याचे पाणी अतिथंड नसावे.      जनावरे धुवायची झाल्यास शक्यतो दुपारच्या वेळी धुवावीत.      जनावरांना लाळ्या खुरकूत आजारापासून संरक्षणासाठी लसीकरण करावे.  ः ०२४२६-२४३२३९ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT