कपाशीवरील टी.एस.व्ही. रोग
कपाशीवरील टी.एस.व्ही. रोग  
कृषी सल्ला

कपाशीवरील टोबॅको स्ट्रीक व्हायरस रोगाचे नियंत्रण

डॉ. शैलेश गावंडे,  डॉ. दीपक नगराळे,  डॉ. नंदिनी गोकटे-नरखेडकर

सध्या कपाशीवर फूलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. फूलकिडीमुळे टोबॅको स्ट्रीक व्हायरस हा अत्यंत नुकसानकारक विषाणूजन्य रोगही कपाशीवर संक्रमित होतो. त्यामुळे या रोगाचे एकात्मिक रोगव्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करावे.

टोबॅको स्ट्रीक व्हायरस हा रोग प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळतो. परंतु, काही वर्षांपासून मध्य भारतातही त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी त्याच्या लक्षणांचा अभ्यास करून उपाययोजना कराव्यात. 

रोगाची प्रमुख लक्षणे :  रोगाचा प्रसार हा फूलकिड्यांमार्फत होतो. प्रादुर्भावामुळे कपाशीच्या कोवळ्या पानांच्या कडा सुकून जातात. जांभळट व तांबड्या रंगाच्या दिसतात व झाडाची वाढ खुंटते. रोगाची तीव्रता प्रामुख्याने गाजरगवताच्या पराग कणांचा संसर्ग, त्याची संख्या, फुलकिड्यांचे प्रमाण व त्यांची झाडांवरील हालचाल या गोष्टींवर अवलंबून असते. महाराष्ट्रामध्ये हा रोग प्रामुख्याने ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान आढळून येतो. 

एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन : 

  • पिकातील रोगग्रस्त काडीकचरा गोळा करून शेताबाहेर त्याची विल्हेवाट लावावी.
  • शेताभोवतीच्या गाजरगवताचे नियंत्रण करावे. कारण गाजरगवताच्या संक्रमित परागकणांमुळे फूलकिड्यांमार्फत या रोगाचा कपाशीमध्ये प्रसार होतो.
  • रोगाला बळी पडणाऱ्या दुसऱ्या पिकांची पाहणी करून ती नष्ट करावीत.
  • रोगाचा वाहक असलेल्या फूलकिड्यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी.  फवारणी प्रतिलिटर पाणी बुप्रोफेझीन (२५ टक्के एस.सी.) १.२ ग्रॅम किंवा फ्लोनिकामीड (५० टक्के डब्लू.जी.) ०.४ ग्रॅम किंवा थायामेथोक्‍झाम (२५ टक्के डब्लू.जी.) ०.२ ग्रॅम 
  • संपर्क : डॉ. शैलेश गावंडे,  ०७१०३ - २७५५३८ (पीक संरक्षण विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

    Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

    Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

    Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

    Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

    SCROLL FOR NEXT