भात रोग नियंत्रण  , आभासमय काजळी, उदबत्ता
भात रोग नियंत्रण , आभासमय काजळी, उदबत्ता 
कृषी सल्ला

निसवणीनंतर भातावरील रोगांचे व्यवस्थापन

एस. आर. परदेशी, डॉ. एच. एम. पाटील

सद्यस्थितीत बहुतांश ठिकाणी भात पीक निसवणीच्या अवस्थेत आहे. निसवण व त्यानंतरच्या काळात भात पिकावर आभासमय काजळी व उदबत्ता यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. वेळीच त्यांचे नियंत्रण केले नाही तर उत्पादनात मोठी घट होते.

आभासमय काजळी

रोगकारक बुरशी : Ustilaginoidea virens

लक्षणे :  भात फुलोऱ्यात आल्यानंतर रोगाची लक्षणे दिसतात. लोंबीतील काही फुलांमध्ये दाणे भरण्याऐवजी शेंदरी रंगाच्या गाठी दिसतात. पुढे या गाठीचा रंग गर्द हिरवट मखमली होतो.

नुकसान : लोंबीमध्ये काळ्या रंगाची भुकटी तयार होते. त्यामुळे दाणे भरत नाहीत व पोचट राहतात.

प्रसार : रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यापासून होतो.

नियंत्रण : रोगग्रस्त झाडे किंवा रोगट लोंब्या काढून नष्ट कराव्यात.

रासायनिक पद्धत : फवारणी प्रतिलिटर पाणी

क्‍लोरोथॅलोनिल १ ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझॉल १ ग्रॅम

उदबत्ता :

रोगकारक बुरशी : Ephelis oryzae

लक्षणे : भात निसवल्यानंतर या रोगाची लक्षणे दिसतात. भात निसवल्यानंतर लोंबी न येता त्या ठिकाणी उदबत्तीसारखी कठीण राखी रंगाची दांडी दिसते. त्यामध्ये दाणे भरत नाहीत.

नुकसान : लोंबीत दाणे भरत नाहीत. त्यामुळे पीक उत्पादनात १०० टक्के घट होते.

नियंत्रण : रोगग्रस्त झाडे उपटून जाळून नष्ट करावीत.

संपर्क : एस. आर. परदेशी, ७५८८०५२७९३

विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT