निंबोळी अर्काची निर्मिती, वापर 
कृषी सल्ला

निंबोळी अर्काची निर्मिती, वापर

सध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंबाच्या निबोंळ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अशा पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून वर्षभरासाठी साठवून ठेवाव्यात. त्यापासून घरगुती निबोंळी अर्क तयार त्याचा वापर केल्यास खर्चात बचतीसह पर्यावरणाचे संतुलन साधण्यास मदत होते.

डॉ. संजोग बोकन, डॉ. बसवराज भेदे

सध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंबाच्या निबोंळ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अशा पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून वर्षभरासाठी साठवून ठेवाव्यात. त्यापासून घरगुती निबोंळी अर्क तयार त्याचा वापर केल्यास खर्चात बचतीसह पर्यावरणाचे संतुलन साधण्यास मदत होते. कडुनिंबाच्या बियांमध्ये अॅझाडिरॅक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल असे अनेक महत्त्वाचे रासायनिक घटक आहेत.हे घटक किडींच्या नियंत्रणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. यांच्या वापराने मित्र कीटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेत परिसरातील कडुनिंबाच्या झाडाच्या पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा कराव्यात. साल व गर काढलेल्या निंबोळी बिया सावलीत कोरड्या जागी वाळवाव्यात. पुढे वापरासाठी कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. वर्षभर कीड प्रतिबंधासाठी व नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचा अर्क काढून वापरता येतो. निंबोळ्यापासून पाच टक्के अर्क तयार करण्याची पद्धत : सावलीत वाळवलेल्या ५ किलो निंबोळ्या चांगल्या कुटून बारीक करून घ्याव्यात. फवारणीच्या आदल्या दिवशी ही ५ किलो पावडर रात्रभर ९ लीटर पाण्यामध्ये भिजत घालावी. सकाळी ते द्रावण फडक्याने चांगले गाळून घ्यावे. दाबून जास्तीत जास्त निंबोळीचा अर्क मिळवावा. या अर्कात ९० लीटरपर्यंत पाणी मिसळावे. १ लीटर पाण्यात २०० ग्रॅम धुण्याची पावडर किंवा साबण चुरा भिजत घालावा. हे द्रावण अन्य नऊ लीटर पाण्यात मिसळून साबण चुऱ्याचे द्रावण तयार करावे. दुसऱ्या दिवशी निंबोळीचा अर्क व साबण चुऱ्याचे १० लीटर द्रावण एकत्र करावे. एकूण १०० लीटर द्रावण तयार होईल. त्यानंतर हे द्रावण फवारणीसाठी वापरावे. हा निंबोळी अर्क पानावर योग्य रीतीने पसरणे व टिकून राहण्यासाठी कपडे धुण्याची पावडर किंवा साबण चुरा मिसळणे गरजेचे आहे. वापर व प्रमाण - निंबोळी अर्काचा वापर कापूस, सोयाबीन, तूर, मूग व भाजीपाला या सारख्या सर्व खरीप पिकांवर करता येतो. निंबोळी अर्क (५ टक्के) ५ मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी. निंबोळी अर्काचा किडीवर होणारा परिणाम : १) भक्षणरोधक : पानांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पाने कडू बनतात. किडी अशी पाने खाणे टाळतात. किडीची उपासमार झाल्यामुळे शेवटी त्या मरतात. २) अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा : कडू वासामुळे पिकांच्या पानांवर, फुलांवर कोवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी घालत नाही. त्यामुळे पुढील पिढी तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ३) प्रजोत्पादन प्रक्रियेत अडथळा येणे : निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे किडीमध्ये नपुंसकता येते. नरमादीमध्ये लिंगाकर्षण कमी होते. परिणाम: पुढील पिढी तयार होण्याचे प्रमाण कमी होते. ४) पिकापासून परावृत्त करणे : निंबोळी अर्काच्या कडू वासामुळे कीड पिकाजवळ येत नाही. ५) किडीच्या कात टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येणे : किडीची नैसर्गिक वाढ होताना अळी अगर पिल्लू अवस्थेत शरीर वाढीसाठी नियमित कात टाकणे आवश्यक असते. निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे त्यात व्यत्यय येतो. ६) अविकसित प्रौढ तयार होणे : कोषावस्थेतून निघालेल्या प्रौढ किडीमध्ये विकृती, अपंगत्व येणे, अविकसित पंख तयार होतात. त्याचबरोबर प्रजोत्पादन क्षमता मंदावते आणि पुढील संभाव्य नुकसान कमी होऊ शकते. ७) जीवनकालावधी कमी होणे : निंबोळी अर्काच्या संपर्कात आलेल्या किडीच्या विविध अवस्थांवर घातक परिणाम होऊन त्यांचा जीवनकालावधी कमी होतो. निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे : १. निर्मिती खर्च अत्यल्प असतो. २. नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नाही. ३. निंबोळी अर्क बनवणे, हाताळणे व वापरणे सोपे आहे. ४. घातक किडींना प्रतिबंध, नियंत्रण करत असले तरी नैसर्गिक शत्रू, मित्रकीटकांसाठी फारसे हानिकारक ठरत नाही. ५. रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल राखता येईल. ६. निंबोळी अर्क/पेंड वापरल्यामुळे जमिनीतील सूत्रकृमी, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित होतात. डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२००० ( संशोधन सहयोगी, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supreme Court: निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची सुप्रीम कोर्टाकडून पडताळणी; केंद्र सरकारला नोटीस

Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार

UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार

Jaydeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती धनखड यांची तब्येत बिघडली; एम्समध्ये उपचार सुरू

Nagauri Ashwagandha: 'नागौरी अश्वगंधा'ला जीआय मानांकन, शेतकऱ्यांना काय होईल फायदा?

SCROLL FOR NEXT