Symptoms of magnesium deficiency
Symptoms of magnesium deficiency 
कृषी सल्ला

काडी पक्वतेच्या अवस्थेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन

डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. आर. जी. सोमकुंवर

सध्याच्या परिस्थितीत बहुतांश द्राक्ष बागेत काडीच्या परिपक्वतेची अवस्था सुरू आहे. या अवस्थेमध्ये खरेतर वाढ नियंत्रण असणे फार गरजेचे असते. मात्र, द्राक्ष विभागामध्ये पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता जास्त प्रमाणात वाढलेली असते. अशा वेळी मुळीद्वारे तयार होत असलेले सायटोकायनीन कमी प्रमाणात तयार होऊन वेलीमध्ये जिब्रेलीनची मात्रा वाढते. त्याचा परिणाम म्हणून फुटीची वाढ जोमात होते. काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. सध्याच्या परिस्थितीत बहुतांश द्राक्ष बागेत काडीच्या परिपक्वतेची अवस्था सुरू आहे. या अवस्थेमध्ये खरेतर वाढ नियंत्रण असणे फार गरजेचे असते. मात्र, द्राक्ष विभागामध्ये पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता जास्त प्रमाणात वाढलेली असते. अशा वेळी मुळीद्वारे तयार होत असलेले सायटोकायनीन कमी प्रमाणात तयार होऊन वेलीमध्ये जिब्रेलीनची मात्रा वाढते. त्याचा परिणाम म्हणून फुटीची वाढ जोमात होते. काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. काडी परिपक्वतेच्या अवस्थेत प्रमुख अन्नद्रव्याची उपलब्धता (उदा. पालाश -पोटॅश) गरजेची असते. खरड छाटणी ते फळछाटणीच्या कालावधीत जवळपास ६० ते ८० किलो पालाश प्रती एकर प्रमाणे देण्याची शिफारस असते. त्याच सोबत मॅग्नेशिअम सारख्या महत्त्वाच्या अन्नद्रव्याची ४० किलो प्रती एकर प्रमाणे याच कालावधीत शिफारस असते. काडी परिपक्वतेच्या काळात जर अन्नद्रव्याचा समतोल बिघडल्यास परिपक्वतेला व काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा होण्यामध्ये अडचणी येतात. या अडचणी शक्यतो जमिनीमध्ये असलेल्या समस्येमुळे होऊ शकते. या करिताच माती आणि देठ परीक्षण महत्त्वाचे असते. जास्त पाऊस झालेल्या परिस्थितीत बोदामधून पालाशचा निचरा होऊन जातो. पावसाच्या परिस्थितीत आपण ठिबक द्वारे पाणी देत नाही. याचाच अर्थ ठिबकद्वारे खतांचा पुरवठाही होत नाही. अशावेळी पालाशची ४ ते ५ ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे तीन दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या पाऊस थांबल्यानंतर करून घ्याव्यात. पालाश सोबत मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो प्रती एकर प्रमाणे जमिनीतून उपलब्धता करावी. यावेळी आपण बरीच अन्नद्रव्ये जमिनीतून किंवा फवारणीद्वारे पुरवत असलो तरी वेलीच्या वाढीमध्ये काही विपरीत परिणाम दिसून येतात. उदा. पानांच्या कडा जळणे (मार्जिनल लिफ क्लोरासीस), किंवा पाने पिवळी पडणे. या समस्या हिरव्या द्राक्ष जातीत आढळून येते. उदा. थॉमसन, सोनाका, माणिक चमण, तास ए गणेश इ. या तुलनेत काळ्या द्राक्ष जातीत पाने एकदम गुलाबी ते लालसर रंगाची झालेली दिसतील. काही पानांची चकाकी वाढेल. ही समस्या मुख्यतः वेलीमध्ये तयार झालेल्या पालाशच्या कमतरतेमुळे होते. जमिनीमध्ये जर चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास किंवा पाण्याची प्रत खराब असल्यास किंवा जमिनीत सोडिअमचे प्रमाण वाढल्यास मुळांद्वारे पालाशचे शोषण कमी होते. अशा परिस्थितीत पानांवर सोडिअमची टॉक्सिसिटी व पोटॅशची कमतरता हे दोन्हीही दिसून येईल. अशी लक्षणे दिसल्यास देठ परीक्षण करून घ्यावे. त्यात सोडिअमची मात्रा ०.५ टक्के व त्यापेक्षा अधिक दिसून येईल. काही ठिकाणी फळछाटणी लवकर घेण्यात येते. अशा बागेत छाटणीला २० ते ३० दिवसाचा कालावधी असल्यास चुनखडी व क्षार या दोन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल.

  • चुनखडी जास्त असलेल्या परिस्थितीत बोद फोडून शेणखतामध्ये सल्फर मिसळून बोद पुन्हा तयार करावेत. सल्फरची मात्रा आपल्या बागेत चुनखडीच्या प्रमाणानुसार ठरवावी लागेल. चुनखडी असलेल्या बागेत साधारण परिस्थितीत ५० सल्फर प्रती एकर मिसळणे गरजेचे असेल.
  • ज्या बागेत सोडिअमचे प्रमाण जास्त आहे, त्या बागेत जिप्सम २०० ते २५० किलो प्रती एकर या प्रमाणे शेणखतामध्ये मिसळून वापरावे.
  • ज्या जमिनीत चुनखडी आणि सोडिअम या दोन्हीचे प्रमाण जास्त आहे, अशा बागेत जिप्समचा वापर न करता फक्त सल्फर जमिनीत शेणखतात मिसळून द्यावे.
  • पानांच्या वाट्या होणे

  • बागेमध्ये काडी परिपक्वतेच्या अवस्थेत पाने बऱ्यापैकी जुनी झालेली असतात. परंतु, ढगाळ वातावरणामुळे वेलीचा जोम वाढत राहतो व नवीन फुटी निघत राहतात. या परिस्थितीत शेंड्याकडील फूट वाढण्याकरिता या नवीन पानांची अन्नद्रव्यांची गरजही जास्त असते. पोटॅश हे सहज वहन होणारे अन्नद्रव्य असल्यामुळे जुन्या पानांतून नवीन पानाकडे याचे वहन लवकर होते. फुटीच्या ज्या भागातून पालाशचे वहन झाले, अशा जुन्या पानांमध्ये पानांच्या वाट्या होताना दिसतात. तर ज्या ठिकाणी वहन होऊन पालाश गोळा झाले, अशी कोवळी पाने अधिक ताजीतवानी दिसतात. एकाच काडीवरील कोवळी पाने पुरेसे पालाश उपलब्ध असल्याने अधिक ताजीतवानी, तर पालाश कमतरतेमुळे जुन्या पानांच्या वाट्या झालेल्या दिसतात. म्हणूनच या अवस्थेत पालाशची उपलब्धता करणे अत्यंत गरजेचे असते.
  • बऱ्याचशा बागेत पालाशच्या कमतरतेमुळे वाट्या झालेल्या पानांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. किंबहुना अशी बाग भुरी रोगांसाठी अधिक संवेदनशील असते. द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये या पूर्वी झालेल्या संशोधनामध्ये भुरीचे प्रमाण जास्त असलेल्या बागेत देठ परीक्षणाच्या अहवालात पालाश कमी असल्याचे दिसून आले. म्हणूनच काडी परिपक्वतेकरिता रोगनियंत्रणास तितकेच महत्त्व आहे. फुटीची वाढ जितकी जास्त झाली असेल, तितकी ती वेल रोगास (उदा. डाऊनी मिल्ड्यू, करपा) बळी पडेल. कॅनोपीची गर्दी असलेल्या वेलीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होईल.
  • ज्या बागेत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी झिंकची कमतरताही दिसून येते. अशा वेळी झिंक सल्फेट ५ किलो प्रती एकर प्रमाणे ठिबकद्वारे फक्त एकदा उपलब्ध करावे.
  • ज्या जमिनीत चुनखडी जास्त आहे किंवा मुळाच्या कक्षेत जास्त पाणी साचले आहे, अशा बागेतील पानाच्या शिरा हिरव्या व उर्वरित भाग पिवळा झालेला दिसेल. ही परिस्थिती लोह (फेरस) च्या कमतरतेमुळे निर्माण होईल. यावर उपाययोजना करताना फेरस सल्फेट २ ते ३ ग्रॅम प्रती लीटर पाणी चार दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. तर फेरस सल्फेट १५ किलो प्रती एकर या प्रमाणे जमिनीतून ठिबकद्वारे एकदाच द्यावे.
  • फवारणीद्वारे अन्नद्रव्याची उपलब्धता करतेवेळी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. उदा. जर फवारणीकरिता वापरण्याच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असेल तर फवारणीद्वारे वापरण्यात येणारी महत्त्वाची अन्नद्रव्यांचे (उदा. पालाश व मॅग्नेशिअम) प्रमाण ५ ग्रॅम प्रती लीटर पेक्षा वाढवू नये. जर पाण्यात क्षाराचे प्रमाण १ ग्रॅम प्रती लीटर असल्यास पालाश किंवा मॅग्नेशिअम हे ४ ग्रॅम प्रती लीटरपेक्षा जास्त नसावे.
  • बोदावर असलेले आच्छादन खरड छाटणीनंतर आपण पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे किंवा बोद खोदल्यानंतर उघड्या पडलेल्या मुळांना संरक्षण म्हणून बोदावर पालापाचोळा व उसाचे पाचट यांचे आच्छादन केले जाते. यामुळे जास्त तापमानात बऱ्यापैकी पाण्याची बचत करता येते. परंतु, बऱ्याच बागेत उपलब्ध पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. एकतर कमी पाणी व त्यामध्ये उपलब्ध क्षार यामुळे मुळाच्या कक्षेच्या बाहेर क्षाराचा निचरा शक्य होत नाही. पावसाच्या पाण्याची प्रत चांगली असते. पाऊस जास्त असल्यामुळे बोदामधील साठलेल्या क्षारांचा निचरा सहज होऊ शकतो. परंतु, आच्छादन असल्यामुळे हे शक्य होत नाही. बोदामध्ये असलेले क्षार कमी करण्याची ही एक चांगली संधी असते. तेव्हा प्रत्येक बागेत बोदावर असलेले आच्छादन काडी परिपक्वतेची अवस्था सुरू होत असताना किंवा पाऊस सुरू होण्यापूर्वी बाहेर काढावे. हेच आच्छादन बोदाच्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून झाकून घेतल्यास क्षाराचा निचरा होईल. त्याच सोबत आच्छादन कुजल्यानंतर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढेल. असे केल्यास कालांतराने जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल. संपर्क-  डॉ. अजयकुमार उपाध्याय, ९८९००७७७२१ (प्रमुख शास्त्रज्ञ, मृदशास्त्र, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT