असे करा करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापन
असे करा करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापन  
कृषी सल्ला

असे करा करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापन

डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. हनुमान गरुड, डॉ. अजय किनखेडकर

करडईवर जगामध्ये  एकूण ७९ प्रकारच्या किडीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात करडईवर ३६ प्रकारच्या किडी आढळून येतात. त्यापैकी मावा, घाटेअळी, उंटअळी, तंबाखुची पाने खाणारी अळी, तुडतुडे, बोंडमाशी, करडईवरील गुझिया सोंडे यांचा समावेश होतो. सध्या राज्यामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव करडईवर सर्वदूर दिसून येत आहे. या किडीमुळे उत्पादनात ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते. मावा ओळख

  • मावा अर्धगोलाकार, रंगानी काळा आणि मृदू शरीराचा असून, शरीरावर पाठीमागच्या बाजूस दोन शिंगे असतात.  
  • पुर्ण वाढ झालेल्या मावा किडीस दोन पंख असतात. पंख असलेल्या माव्याची जास्त संख्या प्रादुर्भाव होण्याच्या सुरुवातीस आणि पिकाच्या शेवटच्या अवस्थेत असते.  
  • या किडीच्या प्रादुर्भावाची सुरुवात ही शेताच्या काठावरील झाडावर होऊन पुढे ती शेतभर पसरते. 
  • नुकसानीचा प्रकार

  • प्रौढ तसेच बाल्यावस्थेतील मावा पिकाच्या शेंडे, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानाच्या शिरावर, पानाच्या मागील बाजूस, खोड आणि फांद्यावर आढळतो.  
  • मावा सोंडेद्वारे रस शोषण करतो. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये झाडाचा बराचसा भाग माव्यानी व्यापून टाकल्याने झाडे काळसर दिसतात. पुढे ती वाळतात.   
  • पीक फुलोरावस्थेत असताना माव्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.  
  • अशा अवस्थेतील प्रादुर्भावामुळे झाडास कमी फुले व बोंडे लागतात. तीव्र प्रादुर्भावांनी झाडे फुले लागण्याआधीच वाळून जातात.  
  • मावा किडीच्या शरीरातून बाहेर पडलेल्या साखरेसारख्या चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते.  
  • पर्यायाने पिकाचे वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादन कमी मिळते. चिकट पदार्थ फुलावर पडल्यामुळे परागीकणाच्या प्रक्रियेवरही प्रतिकूल परीणाम होतो. दाणे कमी प्रमाणात भरतात.
  • संपर्कः डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (कृषी विज्ञान केंद्र, खामगाव ता. गेवराई, जि. बीड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

    Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

    Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

    Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

    Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

    SCROLL FOR NEXT