pod borer in pigeon-pea
pod borer in pigeon-pea 
कृषी सल्ला

तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. हनुमान गरुड

तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे - हिरवी अळी, घाटे अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी. ही कीड बहुभक्षी असून कडधान्यामध्ये प्रामुख्याने तूर व हरभरा या पिकावर किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. ओळख आणि जीवनक्रम 

  • अंडी ः मादी पतंग तुरीच्या कोवळ्या पानावर, देठावर किंवा कळ्या, फूल शेंगावर पिवळसर पांढऱ्या रंगाची घुमटाकार एक एक अशी अंडी घालते. अंड्यातून ४-७ दिवसात अंडी उबवून अळ्या बाहेर पडतात.
  • अळी ः पोपटी रंगाची किंवा हिरवट पिवळसर असून, यात विविध रंग छटा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३७-५० मि. मी. लांब असून, शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. अळी अवस्था १४-१६ दिवसात पूर्ण होते.
  • कोष ः ही अळी तुरीच्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्टनात कोषावस्थेत जाते. कोषातून या किडीचे पतंग बाहेर पडतात.
  • पतंग ः या किडीचा पतंग पिवळसर रंगाचा असून, तपकिरी रंगाच्या पुढील पंखावर काळे ठिपके असतात. मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात. या किडीची मादी पतंग एक एक अशी सरासरी ६०० ते ८०० अंडी घालते.
  • नुकसानीचा प्रकार:

  • अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या अगोदर तुरीची कोवळी पाने खातात.
  • तूर फुलोऱ्यात असताना तुरीच्या कळ्या, फूल, व शेंगावर आक्रमण करतात.
  • शेंगा लागल्यावर ही अळी तुरीच्या शेंगांना अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील परिपक्व आणि अपरिपक्व दाणे खाते. एक अळी ७ ते १६ शेंगाचे नुकसान करू शकते. -एका प्रयोगानुसार तुरीच्या प्रती झाड १ अळी असल्यास उत्पादनात हेक्टरी १३८ किलो घट, तर एका झाडावर ३ अळ्या असल्यास उत्पादनात ३०८ किलो प्रती हेक्टर इतके मोठे नुकसान होते.
  • ढगाळ वातावरण या किडीसाठी पोषक असल्याने या वातावरणात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • एकात्मिक व्यवस्थापन

  • शेताच्या बांधावरील शेंग पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही वेळोवेळी काढून टाकावीत.
  • प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत.
  • पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा.
  • पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे शेतात लावावेत.
  • शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.
  • तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी गोळा करून नष्ट कराव्यात.
  • जैविक नियंत्रणासाठी...

  • पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक ( ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम ) ३ मिली प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
  • अळी लहान अवस्थेत असताना एच. ए. एन. पी. व्ही. विषाणुची (२५० एल. ई.) प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी सायंकाळी करावी.
  • आर्थिक नुकसानीची पातळी :

  • १ ते २ अळ्या प्रती झाड किंवा सरासरी ८- १० नर पतंग प्रती कामगंध सापळा सलग ३ दिवस आढळणे किंवा ५ टक्के शेंगाचे नुकसान.
  • ही पातळी ओलांडल्यास खालील रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.
  • नियंत्रण फवारणी (प्रति लिटर पाणी)

  • क्विनॉलफॉस (२५ ईसी) २.८ मिली किंवा
  • इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४५ ग्रॅम किंवा
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.३ मिली किंवा
  • फ्ल्युबेंडिअमाईड (३९.३५ एससी) ०.२ मिली किंवा
  • इंडोक्झाकार्ब (१५.८ एससी) ०.७ मिली.
  • संपर्क- डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ -कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT