coconut advisory 
कृषी सल्ला

नारळातील फुलोरा न येण्याच्या समस्येवरील उपाययोजना

नारळ बागेमध्ये फुलोरा न येण्याची विविध कारणे आहेत. यामध्ये सर्वप्रथम नारळ जातींचा विचार करावा, नारळाच्या जातीनुसार त्याला फुलोरा येत असतो.

डॉ.दिलीप नागवेकर

नारळ बागेमध्ये फुलोरा न येण्याची विविध कारणे आहेत. यामध्ये सर्वप्रथम नारळ जातींचा विचार करावा, नारळाच्या जातीनुसार त्याला फुलोरा येत असतो. ठेंगू जाती 

  • यामध्ये फुलोरा साडेतीन ते चार वर्षांनी येतो. या जातींमध्ये चौघाट ऑरेंज डॉर्फ, चौघाट ग्रीन डॉर्फ आणि मलायन ग्रीन डॉर्फ आणि मलायन यलो डॉर्फ यांचा समावेश आहे.
  • या जातींचे आयुष्य ३० ते ३५ वर्षाचे असून खोबऱ्याची प्रत चांगली नाही,  परंतु शहाळे पाणी म्हणून वापर होतो.
  • उंच जाती

  • या जातींमध्ये  फुलोरा ६ ते ७ वर्षांनी येत असतो.
  • यामध्ये  बाणवली, लक्षद्वीप, ईस्ट कोस्ट टॉल, प्रताप केराबस्तर इ.जातींचा समावेश आहे.
  • या जातींचे  आयुष्य ७० ते ९० वर्ष किंवा त्याहून अधिक आहे.
  • खोबऱ्याची प्रत चांगली असते.
  • संकरीत जाती

  • यामध्ये फुलोरा ४ ते ५ वर्षात येतो.
  • यामध्ये  टी X डी, डी X टी,  कोकण भाटये नं.१ इ.जातींचा समावेश आहे.
  • या जातींचे आयुष्य ६० ते ८० वर्ष असते.
  • उपाययोजना 

  • जातीनुसार फुलोरा येत नसेल तर कुठेतरी आपल्या मशागतीत दोष आहे असे समजावे.
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन नारळ झाडातील अंतर योग्य असणे आवश्यक आहे. नारळाची बाग तयार करताना दोन झाडामध्ये ७.५ X ७.५ मीटर (२५ X २५ फूट) अंतर आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुंपणाच्या कडेने, रस्त्याच्या बाजूने एकाच ओळीत लागवड करावयाची झाल्यास २० फूट अंतर ठेवले तरी चालू शकते. येथे नारळाच्या झावळ्यांचा विचार करण्याची गरज आहे. 
  • लागवडीत नारळाच्या झावळ्या एकमेकांमध्ये गुंतता कामा नयेत. त्याला योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे आहे. लागवडीनंतर दोन उन्हाळी हंगामात नारळास सावली लागते त्यानंतर मात्र त्याला आयुष्यभर सूर्यप्रकाशाची गरज असते. निसर्गाने नारळांचे झावळीची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की, सर्व झावळ्यांना योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळेल.
  • कमी अंतर अगर घट्ट लागवड केल्यास नारळ झाडे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी एकमेकात स्पर्धा करतात आणि अल्पावधीत उंच वाढतात. त्यांना फळधारणा होण्यास उशीर लागतो. ज्यावेळी ती वेडीवाकडी वाढून सूर्यप्रकाशात पोहोचतात, त्यावेळी त्यांना फुलोरा येण्यास सुरुवात होते. यामध्ये काही वेळा १२ ते १५ वर्षांचा कालावधी निघून जातो.
  • कुंपणाच्या कडेने, भात शेतीच्या बांधावर, कातळावर, पाण्याच्या पाटावर लागवड केल्यास सूर्यप्रकाश, मुळांची वाढ यावर विपरीत परिणाम होऊन झाडापासून उशिरा उत्पादन सुरू होते.
  • झाडांना शिफारशीनुसार पाणी आणि खतांचे नियोजन करावे.
  • संपर्क- डॉ.दिलीप नागवेकर, ९४२११३७७६९ (माजी कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

    Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

    National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

    Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

    Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

    SCROLL FOR NEXT