भाजीपाला सल्ला
भाजीपाला सल्ला 
कृषी सल्ला

भाजीपाला सल्ला

डॉ. एस. एस. घावडे

सध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोबी, प्लॉवर, कांदा, लसूण, गाजर, मुळा, पालक मेथी या पिकांची ठरावीक क्षेत्रावर लागवड करावी. या पिकांपासून ठरावीक कालावधीत उत्पादन मिळत राहील या पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी. कोबी, प्लॉवर ः १) कोबीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये लवकर येणाऱ्या अाणि उशिरा येणाऱ्या जाती उपलब्ध आहेत. २) प्लॉवर पिकाच्या अर्ली कुवारी, पुसा दीपाली या लवकर येणाऱ्या जाती आहेत. पुसा सिंथेटिक ही हळवी जात आहे. स्नोबॉल १, स्नोबॉल १६ या जाती उशिरा येणाऱ्या जाती आहेत. २) कोबी पिकाच्या गोल्डन एकर, प्राईड आॅफ इंडिया, पुसा ड्रम हेड, अर्ली ड्रम हेड या जातींची निवड करावी. ३) हेक्टरी ६०० ते ७५० ग्रॅम प्लॉवर आणि ४०० ते ५०० ग्रॅम कोबीचे बियाणे लागते. गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाणास एक ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीज प्रक्रिया करावी. ४) साधारणपणे ४० दिवसांत रोपे लागवडीस तयार होतात. रोपांची लागवड ४५ सें.मी बाय ४५ सें.मी. किंवा ६० सें.मी. बाय ६० सें.मी. अंतराने करावी. कांदा आणि लसूणः १) कांदा बीजोत्पादनासाठी ४० ते ६० ग्रॅम वजनाचा कांदा निवडावा. अानुवंशिकदृष्ट्या शुद्ध असणाऱ्या जातींची निवड करावी. लसूण आणि कांद्याची आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करावी. २) लसणाची लागवड १० सें.मी. बाय १० सें.मी. आणि कांद्याची लागवड ६० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतराने करावी. लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बेन्डाझिमच्या (२.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) द्रावणात बुडवाव्यात. 3) बीजोत्पादनासाठी हेक्टरी २२ ते २५ क्विंटल कांदे लागतात. लसणाच्या पाकळ्या ५ क्विंटल लागतात. लसणाच्या जी-४१,जी.३२३, श्‍वेता, गोदावरी या जातीची निवड करावी. पांढरा कांद्याची अकोला सफेद, लाल कांद्याची बसवंत ७८०, फुले समर्थ या जातींची निवड करावी. गाजर, मुळा लागवड १) गाजराच्या पुसा केसर, पुसा मेघाली या जातींची निवड करावी. २) मुळा पिकाच्या जापनीज व्हाईट, पुसा केतकी, पुसा देशी या जातींची निवड करावी. ३) पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास २.५ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. ४) प्रतिहेक्टरी मुळ्याचे ८ ते १० किलो आणि गाजराचे ५ किलो बियाणे लागते. ५) मुळा, गाजराची लागवड ४५ सें.मी. बाय १० सें.मी. अंतरावर करावी. पालक, मेथी लागवड ः १) पालकाच्या आॅलग्रीन, जॉबनेर ग्रीन, पुसा हरित या जातींची लागवड करावी. २) मेथीच्या कस्तुरी, पुसा अर्ली बंचिंग या जातीची लागवड करावी. ३) प्रतिहेक्टरी पालकाचे ४० किलो आणि मेथीचे ३० किलो बियाणे लागते. ४) लागवड सपाट वाफ्यात ३० सें.मी. ओळीत अंतर ठेऊन करावी. ५) ही पिके ४० दिवसांत तयार होतात. या पिकाच्या २५ दिवसाने कापणी करावी. दोन ते तीन कापण्या करता येतात. संपर्क ः डॉ. एस. एस. घावडे ः ७०२०५७५८६७ (भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

Painganga Project : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

SCROLL FOR NEXT