कृषी सल्ला
कृषी सल्ला 
कृषी सल्ला

कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ, वेलवर्गीय भाजीपाला, फळबाग रोपवाटिका

कृषी विद्या विभाग, दापोली

भात

  •  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर येण्याची अवस्था.
  •  भात पीक पक्वतेच्या अवस्थेत पोचत आहे, अशा स्थितीत भात पिकाला सिंचनाची आवश्यकता असते. पावसाची उघडीप असल्यास पिकाला पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • सुरवातीच्या काळात मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुढील काळातील उघडिपीमुळे खोलगट भागातील भात शेतीमध्ये पाणी साचून राहते. अशा भात खाचरांमध्ये तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोपाच्या चुडात १० तुडतुडे आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी   अॅसिफेट (७५ टक्के) २.२५ ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५ टक्के) २ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ०.२ मि.लि.
  • खाचरात पाणी जास्त काळ साठू देऊ नये. बांध फोडून पाणी पुढे जाऊ द्यावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.
  • निळे भुंगेरे नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (२.५ टक्के) ०.६ मि.लि. टीप ः फवारणी करताना कीटकनाशकाचे द्रावण चुडाच्या बुंध्यावर पडेल, याची दक्षता घ्यावी.
  •  जिवाणूजन्य करपा प्रादुर्भाव दिसत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी स्ट्रेप्टोमायसीन* ०.५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम.
  • नागली     अवस्था ः फुटवे येण्याची. पावसाची उघडीप असल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचनाची व्यवस्था करावी.

    आंबा नवीन पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कीडग्रस्त पालवी अळीसहीत नष्ट करावी. फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि.

    नारळ

  •  गेंडा भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी, बागेतील काडी कचरा वेचून स्वच्छता ठेवावी.
  •  बागेतील शेणखताच्या खड्ड्यामध्ये गरजेनुसार क्लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे नारळातील गेंडा भुंगा या किडीच्या नियंत्रणाला मदत होते.
  • वेलवर्गीय भाजीपाला अवस्था ः फळधारणा वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये विविध ठिकाणी पाने खाणारी अळी, तांबडे भुंगे, तुडतुडे, मावा अशा किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. किडीपासून संरक्षणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट १.५ मि.लि.

    फळबाग रोपवाटिका ः     पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचनाची व्यवस्था करावी.     बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी फळ रोपवाटिकेतील कलमांना कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची प्रति रोप ५० मि.लि. या प्रमाणात आळवणी करावी.  ः ०२३५८ - २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

    Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

    Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

    Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

    Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

    SCROLL FOR NEXT