ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पिकाच्या मुळांजवळ खत आणि पाणी योग्य प्रमाणात देण्यास मदत होते. 
 हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी आंतरमशागतीची कामे वेळेवर करणे गरजेचे आहे. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो.       हळद हे एक प्रमुख मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधने, जैविक किटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. महाराष्ट्रातील हवामान हळद पिकासाठी उत्तम आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.      सध्या हळद लागवड होऊन १२० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हळदीची शाकीय वाढ पूर्ण होण्यासाठी ४६ ते १५० दिवसांचा कालावधी महत्त्वाचा असतो. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात तसेच नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते. पावसाळ्यात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ होते. याकाळातील २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान शाकीय वाढीसाठी पूरक ठरते. तापमानात जास्त घट झाल्यास हळद पिकांवर विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकारावर विपरीत परिणाम होतो.       खत व्यवस्थापन     हळद पिकास खतांमधील सर्वच घटकांची कमी-अधिक प्रमाणात गरज असते.
 पाणी व्यवस्थापन     पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी साठून राहिल्यामुळे मुळांना हवा (ऑक्सिजन) मिळण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून मलूल होतात. त्यासाठी साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.
 -डॉ. मनोज माळी,९४०३७ ७३६१४   डॉ. दिलीप पेंडसे ...९७३०९१०२७२    (प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज जि.सांगली)