लष्करी अळी ही बहुभक्षीय कीड ८० टक्क्यांपेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते. त्यातही गवतवर्गीय पिके उदा. मका, मधुमका, ज्वारी ही तिची आवडते खाद्य आहे. ही अमेरिकेतील मका पिकावरील कीड असून, जून २०१८ मध्ये भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव आढळली. अमेरिकन लष्करी अळी इंग्रजी नाव - फॉल आर्मीवर्म शास्त्रीय नाव - स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा. जीवनक्रम चार अवस्था - अंडी, अळी, कोष व पतंग. (सर्व अवस्था - ३२ ते ४६ दिवस) अंडी अवस्था (२ ते ३ दिवस)
मादी पानांच्या वर आणि खालील बाजूस, पोंग्यामध्ये पुंजक्यांमध्ये सुमारे एक हजार अंडी घालते.- पुंजक्यामधील अंड्यांवर लोकरीसारखे आवरण असते.डी घुमटाकार, पिवळट सोनेरी असतात. अळी अवस्था (१४ ते १९ दिवस)
अळी सहा अवस्थांमधून जाते.अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या काळ्या असून, त्यांचे डोके हिरवे असते.दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर अळीचे डोके तपकिरी, तर तिसऱ्या अवस्थेमध्ये रंग तपकिरी होतो. अंगावर वरील बाजूने तीन पांढऱ्या रेषा असतात.चौथ्या ते सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर उंचवट्यासारखे ठिपके असतात.पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत २ ते ८ सें.मी. खोलीवर मातीचे आवरणात कोषावस्थेत जाते.कोष लालसर तपकिरी रंगाचा असतो. नर पतंग राखाडी ते तपकिरी, पुढील पंखांच्या वरील बाजूला त्रिकोणी आकारात पांढरा ठिपका व पंखाच्या मध्यभागी गोल ठिपका असतो.मादी पतंगाचे पुढचे पंख राखाडी असतात.नर, मादी पतंगांचे दोहोंचे मागील पंख सोनेरी असतात.डोक्याच्या पुढील बाजूस उलट इंग्रजी वाय आकाराची खूण असते.शरीराच्या आठव्या बॉडी सेगमेंटवर चौकोनी आकारात चार ठिपके असतात. त्यास केसही आढळतात.शरीरावर अन्यत्र अशी ठेवण नसते.पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या मका रोपावस्थेतील पाने खरवडून खातात. पानावर पांढरे लांबट चट्टे दिसतात. लहान रोपांवर अशी लक्षणे दिसल्यास प्रादुर्भाव असल्याचे समजून उपाययोजना कराव्यात.तिसऱ्या अवस्थेतील अळी पोंग्यामध्ये प्रवेश करून पाने खाण्यास सुरुवात करते. पानांवर लहान छिद्रे दिसतात.चौथ्या, पाचव्या, सहाव्या अवस्थेतील अळी अधाशीपणे पाने खाते. पोंग्यात मोठ्या प्रमाणात विष्ठा दिसून येते.तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. असा प्रादुर्भाव मधुमक्यावर जास्त दिसतो. मका पेरणीपूर्व सायॲण्ट्रानिलीप्रोल (१९.८%) अधिक थायामेथोक्झाम (१९.८%) या संयुक्त कीडनाशकाची बीजप्रक्रिया करावी. बहुतांश बियाणे कंपन्याकडून ही प्रक्रिया केलेली असते. ते पाहून बीज प्रक्रियेचा निर्णय घ्यावा.मका पीक उगवून येताच पहिल्या पोंग्यावरील पान बाहेर पडल्याबरोबर निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि किंवा बी टी २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. किंवा मेटाऱ्हायझीम ॲनीसोप्ली किंवा नोमुरिया रिले १० ग्रॅम किंवा बिव्हेरिया बॅसियाना १० मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.किडीच्या सर्वेक्षणासाठी व नियंत्रणासाठी एकरी १५ कामगंध सापळे स्पोडोल्यूरसह लावावेत. रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
इमामेक्टिन बेंजोएट (५%) ०.४ ग्रॅम किंवा,थायामेथोक्झाम (१२.६० %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५० %) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मिलि किंवाक्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५%) ०.४ मिलि किंवास्पिनोसॅड ३ मिलि. - अशोक चांदर (आचार्य पदवी विद्यार्थी), ९३७००७४००८ डॉ. अनुराग तायडे (सहायक प्राध्यापक), ८२९९५७०८४० (कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश)