Infestation of pest on maize crop 
कृषी सल्ला

मक्यावरील किडींचा प्रादुर्भाव...

मका पिकामध्ये ढगाळ हवामानामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

सुशांत महाडीक, डॉ. सुनील कराड, डॉ. शैलेश कुंभार

मका पिकामध्ये ढगाळ हवामानामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात. खोड कीड

  • अळी सुरुवातीला पानावर उपजीविका करून नंतर पोंग्यातून आत शिरते. रोपाच्या आतील भागावर उपजीविका करते. परिणामी सुरळी वाळते.
  • कीड पोंग्यातून आत शिरत असल्याने पानांवर एका सरळ रेषेत बारीक छिद्रे दिसून येतात.
  • प्रादुर्भाव रोपावस्था तसेच पीक फुलोऱ्यात असताना होते.
  • नियंत्रणाचे उपाय 

  •  वाळलेल्या सुरळ्या अळ्यांसहित उपटून जाळून टाकाव्यात.
  •  शेत स्वच्छ ठेवावे. प्रकाश सापळा वापरावा.
  • रासायनिक नियंत्रण डायामिथोयेट (३० ईसी) १.२ मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारावे. जैविक नियंत्रण 

  • ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेली ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावीत.
  • अझाडिरेक्टीन (१५००पीपीएम) ४.५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे.
  • प्रतिबंधात्मक उपाय  खोडकिडींची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी पिकांचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे. अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा) 

  • अळी आपली उपजीविका पानांवर करते. सुरुवातीच्या अवस्था कोवळ्या पानांवर उपजीविका करतात. नंतर पोंग्यात छिद्र पडून आत शिरून आतील भागावर उपजीविका करतात.
  • दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी काही वेळा पानांच्या कडापासून आतल्या भागापर्यंत खातात. नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने पीकवाढीचा भाग खातात, जेणेकरून तुरा बाहेर येत नाही. कोवळी कणसे खातात.
  • नियंत्रणाचे उपाय 

  •  शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.
  • एकरी १५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
  • किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही.
  • पिकाच्या सुरवातीच्या ३० दिवसांपर्यंत पोंग्यात वाळू व चुना ९:१ या प्रमाणात टाकावे.
  • एकरी १० पक्षिथांबे लावावेत.
  • रासायनिक नियंत्रण  फवारणी : प्रति लिटर पाणी अळीच्या वाढीच्या लवकरच्या (१ ते ३ अवस्था) अवस्था 

  • निंबोळीवर आधारित कीडनाशक (अझाडिरेक्टीन) ( १५०० पीपीएम) ५ मिलि पाण्यात मिसळून फवारणी.
  • स्पिनोटोराम (११.७% एससी) ०.५ मिलि) किंवा
  • क्लोर अँट्रानिलीप्रोल (१८.५% एस.सी.) ०.४ मिलि किंवा
  • थायामेथोक्झाम (१२.६%) + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेड.सी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि
  • जैविक नियंत्रण 

  • अंड्यांवर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची हेक्टरी ५०,००० अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा शेतात सोडावीत.
  • नोमुरीया रायली (२ ते ३ ग्रॅम) किंवा मेटारायझिअम ॲनिसोप्ली (५ ते १० ग्रॅम), यापैकी एका बुरशीजन्य कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • प्रतिबंधात्मक उपाय  पिकांचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे. कणसे पोखरणारी अळी 

  • अळी प्रथमत: मक्याच्या स्त्री केसरावर उपजीविका करते. त्यानंतर ती कणसात प्रवेश करते व दाण्यांवर उपजीविका करते.
  • कीड दाणे खात असल्याने उत्पादन घटते. विष्ठेमुळे कणसात बुरशीची वाढ होते. कणसांची गुणवत्ता खालावते.
  • जैविक नियंत्रण 

  • ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रति हेक्टरी लावावेत.
  • एचएएनपीव्ही २५० एल ई प्रति हेक्टरी वापरावे.
  • प्रतिबंधात्मक उपाय पिकांचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे. संपर्क ः ०२३१- २६०१११५ (अखिल भारतीय समन्वित मका संशोधन प्रकल्प, कसबा-बावडा, कोल्हापूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

    Subsidy Fraud: अनुदान अपहारप्रकरणी सात कर्मचारी बडतर्फ 

    Jal Jeevan Mission: सरकारकडून निधी न आल्याने ‘जलजीवन’ची बिले थकली

    Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

    Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

    SCROLL FOR NEXT