सीताफळांची आकारमानानुसार प्रतवारी करताना विलास काळे.
सीताफळांची आकारमानानुसार प्रतवारी करताना विलास काळे. 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन : पीक सीताफळ

sandeep navale

शेतकरीः विलास तात्याबा काळे गावः सोनोरी, ता पुरंदर, जि.पुणे एकूण क्षेत्रः ८ एकर सीताफळ क्षेत्रः २ एकर माझी पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे आठ एकर शेती आहे. त्यापैकी दोन एकरावर सीताफळ आणि उर्वरित क्षेत्रामध्ये अंजीर, पेरू, चिकू, भुईमूग, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड आहे. एकूण लागवडीपैकी एक एकरावर १५ वर्षे वयाची ३०० झाडे आणि उरलेल्या १ एकरावर १० वर्षे वयाची २०० सीताफळ झाडे आहेत. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेण्यावर माझा भर असतो. इतर फळपिकांच्या तुलनेत सिताफळास कमी पाणी लागते. त्यामुळे कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक उत्पादन आणि चांगला बाजारभाव देणारे फळझाड आहे. यावर्षीचे नियोजन 

  • मे महिन्यात बागेची छाटणी केली. जुनी वाळलेली फळे आणि फांद्या काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावली. त्यानंतर आंतरमशागतीची कामे केली.
  • खतांच्या मात्रा देण्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने आळी तयार करून घेतली.
  • बहार धरण्याच्या एक महिनाआधी उपलब्धतेनुसार शेणखत, लेंडीखत, कोंबडीखताचा वापर करण्यात आला. त्यामुळे फळांचा रंग आणि प्रत उत्तम राहण्यास मदत होते.
  • साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात आवश्‍यकतेनुसार बागेस ठिबकद्वारे पाणी दिले.
  • सिताफळाला पालवी व कळी निघाल्यानंतर बुरशीजन्य आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी फवारणीचे नियोजन करण्यात आले.
  • फळधारणा झाल्यानंतर फळे काळी पडू नये यासाठी दर १५ दिवसांनी फवारणी केली.
  • काढणी आणि विक्री नियोजन  फळांची योग्य परिपक्वतेला काढणी करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळण्यास मदत होते. बाजारभावाची माहिती घेऊन विक्री नियोजन केले जाते. जेणेकरून चांगला दर मिळेल.

  • बहार धरल्यानंतर साधारण ९० दिवसांनी फळे काढणीस येतात. साधारण सप्टेंबर महिन्यापासून योग्य आकाराची फळे तयार होण्यास सुरुवात झाली. मजुरांच्या मदतीने फळे तोडण्यात आली. तोडलेल्या फळांची आकारमानानुसार प्रतवारी करून कॅरेटमध्ये भरली. आणि थेट सासवड, पुणे बाजार समितीत विक्रीसाठी पाठविली.
  • हंगामात रोज सीताफळांचे ३० ते ३५ कॅरेट विक्रीसाठी पाठविले जात. एक कॅरेट साधारण २० किलो वजनाचा असतो. प्रति किलो दहा ते १०० रूपयांपर्यत दर मिळाला. सरासरी ७० रूपयांपर्यत दर मिळाला.
  • सीताफळाच्या २ एकरातील ५०० झाडांपासून सुमारे साडेचार ते ५ टनांचे उत्पादन मिळाले.
  • - विलास काळे, ९८५०५१७६८३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

    Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

    Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

    SCROLL FOR NEXT