Wheat cultivation by Hemant Chaudhary 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक : गहू

दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर रासायनिक खतांचा वापर करून ४ एकरावर गहू लागवडीचे नियोजन असते. सेंद्रिय पद्धतीच्या प्लॉटमध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नाही. त्यामुळे सेंद्रिय गव्हास मागणी असलेला मोठा ग्राहकवर्ग मला मिळाला आहे. उत्तम चव आणि योग्य पॅकिंगमुळे गव्हास मोठी मागणी आहे.

मुकुंद पिंगळे

 दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर रासायनिक खतांचा वापर करून ४ एकरावर गहू लागवडीचे नियोजन असते. सेंद्रिय पद्धतीच्या प्लॉटमध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नाही. त्यामुळे सेंद्रिय गव्हास मागणी असलेला मोठा ग्राहकवर्ग मला मिळाला आहे. उत्तम चव आणि योग्य पॅकिंगमुळे गव्हास मोठी मागणी आहे. शे तकरी  : हेमंत अंबादास चौधरी   गाव :  दिक्षी, ता. निफाड, जि.नाशिक   एकूण क्षेत्र :  ४९ एकर   गहू क्षेत्र :  १४ एकर मी वर्षभर भाजीपाला पिकांसह द्राक्ष, पेरू, डाळिंब ही फळपिके घेत असतो. रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू पिकासह हरभरा, ज्वारीची लागवडही असते. सर्व पिकांमध्ये शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेण्यावर माझा विशेष भर असतो. दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर रासायनिक खतांचा वापर करून ४ एकरावर गहू लागवडीचे नियोजन असते. सेंद्रिय पद्धतीच्या प्लॉटमध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नाही. त्यामुळे सेंद्रिय गव्हास मागणी असलेला मोठा ग्राहकवर्ग मला मिळाला आहे. उत्तम चव आणि योग्य पॅकिंगमुळे गव्हास मोठी मागणी आहे. गहू लागवडीसाठी हवामान बदलास अनुकूल, अधिक उत्पादकता, तांबेरा प्रतिरोधक व चव या मुख्य बाजू पडताळून वाणाची निवड केली जाते. त्यानुसार ३ नावीन्यपूर्ण वाणांचा पेरणीसाठी वापर केला जातो.  या अनुषंगाने सेंद्रिय पद्धतीच्या प्लॉटमध्ये मध्यप्रदेश व तमिळनाडू राज्यातून आणलेल्या स्थानिक वाणांची पेरणी करतो. या वाणांच्या ओंब्या अतिथंडीमध्ये पिवळ्या पडत नाहीत, तसेच तापमान वाढीचा कोणताही परिणाम या वाणांवर होत नसल्याचा माझा अनुभव आहे.  यावर्षीचे नियोजन 

  • पेरणीपूर्वी जमिनीची खोलगट नांगरट केली. 
  • खरिपातील सोयाबीन पीक काढणी केलेल्या क्षेत्रामध्येच गहू लागवडीचे नियोजन असते. सोयाबीन पीक अवशेष शेतामध्येच कुजविले जातात. त्यामुळे या शेतामध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर प्रमाणात उपलब्ध झाला असल्याने अतिरिक्त खत मात्रा देण्याची आवश्यकता भासत नाही. 
  • ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे दोन ओळींत ५ ते ६ इंच अंतरावर ८ आणि ९ डिसेंबरला पेरणी पूर्ण केली. 
  • सेंद्रिय पद्धतीची लागवड वगळून उर्वरित क्षेत्रामधील पेरणीपूर्वी बियाणास जैविक बुरशीनाशकांची प्रक्रिया केली.    पेरणीसाठी एकरी ४० किलो बियाणे लागले.
  • पेरणीवेळी सेंद्रिय लागवडीचा प्लॉट वगळून उर्वरित ४ एकरांमध्ये आवश्यकतेनुसार १५:१५:१५ आणि सल्फर खताची एकरी ३ किलो मात्रा टोकण यंत्राने दिली.
  • वाढीच्या अवस्थेत व्यवस्थापन 

  • पेरणीनंतर २३ ते २७ दिवसांनी आंबवणी फुटवा अवस्थेत तर पुढील पाणी २० ते २५ दिवसांनी वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन दिले जाते.
  • सेंद्रिय गहू लागवडीमध्ये निंदणी करून तणनियंत्रण केले जाईल. उर्वरित क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार तणनाशकांचा वापर केला जाईल. 
  • काढणी 

  •  गहू काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जातो.  काढणीनंतर गहू वाळवून दाण्याच्या आकारानुसार प्रतवारी व पॅकिंग केली जाते. 
  •  दरवर्षी एकरी सरासरी १८-२२ क्विंटल उत्पादन मिळते.  प्रतवारी आणि पॅकिंगमुळे चांगला दर मिळण्यास मदत होते. 
  • - हेमंत चौधरी, ९८८१३३९९९९

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Village Story: आठवणींची फुलवात...

    El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

    Water Conservation: जल-सृष्टी व्यवस्थेचे जनकेंद्री पुनरुज्जीवन

    Grain Storage Pest Management: धान्य साठवणुकीतील ‘लेसर ग्रेन बोरर’

    Rural Education Programme: जैवविविधता, शिक्षणाशी जोडणारी मायेसा फाउंडेशन

    SCROLL FOR NEXT