Sheshrao Ghoderao in his orange orchard.
Sheshrao Ghoderao in his orange orchard. 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक : संत्रा

Vinod Ingole

मी सात वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली आहे. मागील वर्षी ९ एकर बागेतून ३५ टन संत्र्याचे उत्पादन मिळाले. मागील वर्षी मृग बहरातील संत्र्याची २४ हजार ५०० रुपये प्रति टन या दराने विक्री करण्यात आली होती. वातावरण बदलाच्या परिणामामुळे उत्पादकता घटली आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. या कारणामुळे या वर्षी संत्रा दरात तेजी अनुभवली जात आहे. या वर्षी ९ एकरांतून ६० टनांचे उत्पादन मिळाले आहे. शेतकरी :  शेषराव नथुजी घोडेराव गाव :  जामगाव खडका, ता. वरुड, जि. अमरावती एकूण क्षेत्र :  २४ एकर संत्रा क्षेत्र: १९ एकर (२७०० झाडे) मृग बहर :  ९ एकर (१३०० झाडे) मी सात वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली आहे. मागील वर्षी ९ एकर बागेतून ३५ टन संत्र्याचे उत्पादन मिळाले. मागील वर्षी मृग बहरातील संत्र्याची २४ हजार ५०० रुपये प्रति टन या दराने विक्री करण्यात आली होती. वातावरण बदलाच्या परिणामामुळे उत्पादकता घटली आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. या कारणामुळे या वर्षी संत्रा दरात तेजी अनुभवली जात आहे. या वर्षी ९ एकरांतून ६० टनांचे उत्पादन मिळाले आहे. व्यापाऱ्यांनी ४७ हजार रुपये प्रति टन या दराने फळांची खरेदी केली आहे. मृग बहराचे नियोजन करताना निंबोळी पेंड, १०:२६:२६, सूक्ष्म  अन्नद्रव्ये, एरंडी पेंड या घटकांचे मिश्रण करून प्रति झाड २ किलो याप्रमाणे दिले जाते. बहार धरण्यापूर्वी मॉन्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर जून महिन्यात हे अन्नघटक देण्यावर भर राहतो. यामुळे झाडाची सुदृढ वाढ होण्यास मदत  होते. या वर्षीचे नियोजन 

  • मागील महिन्यात १५ फेब्रुवारीला हवामान खात्याने वादळाची शक्यता वर्तवली होती. या संधीचा फायदा घेत बाजारात व्यापाऱ्यांनी संत्र्याचे दर पाडले. प्रति टन ४५ हजार रुपये असलेले दर ३५ हजार रुपयांपर्यंत खाली आले. शेतकऱ्यांनी दर आणखी खाली येतील या भीतीमुळे बागा विक्रीचा निर्णय घेतला. मी मात्र थांबलो.
  • २५ फेब्रुवारीपासून तापमानात वाढ झाली. संत्र्यावर भाजल्यासारखे डाग पडण्यास सुरुवात झाली. या काळात पाट पाणी देण्याऐवजी ठिबकने पाणी देण्याचे नियोजन केले. पाट पाण्यामुळे पाण्याचे तापमान वाढते, त्यामुळे दुहेरी फटका बसण्याची शक्यता होती. ठिबकद्वारे प्रति दिन ४ तास पाणी देण्यात आले. 
  • यापुढील काळात तापमानवाढीमुळे फळांवर डाग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभावित धोका लक्षात घेता ५ मार्चला बाग विक्रीचा निर्णय घेतला. या वेळी ४७ हजार रुपये टनांचा उच्चांकी दर मिळाला. 
  • ठिबकने पाणी देण्याच्या निर्णयामुळे आंबिया बहर फुटला नाही तसेच फळगळ कमी प्रमाणात  झाली.
  • आंबिया बहर फुटला असता तर फळमाशीचा प्रादुर्भावही वाढीस लागतो. त्यामुळे मृगबहरातील संत्र्याची फळगळ वाढते. या सर्व बाबींवर ठिबकने पाणी दिल्यामुळे नियंत्रण मिळवता आले.
  • पुढील पंधरा दिवसांतील नियोजन 

  • संत्रा झाडांना आधार देण्यासाठी बांबू लावले होते. आता फळांची काढणी झाल्याने बाग सशक्त होण्याकरिता दिलेला आधार काढणार आहे.
  • बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता बुरशीनाशक, कीटकनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करण्याचे नियोजन आहे. 
  • नवतीची पालवी रोगमुक्त राहण्यासाठी या फवारण्या घेणार आहे.
  • फवारणीनंतर रोटावेटर मारून, तणाचे नियंत्रण करून बाग स्वच्छ केली जाईल.
  • पुढील बहराच्या नियोजनाकरिता ठिबकने पाणी देण्याचे वेळापत्रक करणार आहे. त्यानुसार पुढील १० दिवस रोज सायंकाळी ४ ते ५ तास पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. 
  • तापमान वाढीस लागल्याने या काळात पाणी दिल्यास बाष्पीभवन होऊन बागेचे तापमान वाढते. त्याचा बागेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसाऐवजी सायंकाळी पाणी देण्यात येईल.
  • - शेषराव घोडेराव,  ९३२५५५९९०७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

    Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

    Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

    Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

    Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

    SCROLL FOR NEXT