बाळकृष्ण वर्पे यांची पिवळ्या झेंडूची केलेली एक एकरवरील लागवड
बाळकृष्ण वर्पे यांची पिवळ्या झेंडूची केलेली एक एकरवरील लागवड 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक : झेंडू

Ganesh Kore

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २ एकर झेंडू फुलांची लागवड केली आहे. साडेचार फुटांच्या गादीवाफ्यावर ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटोची लागवड केलेली असते. टोमॅटोचा हंगाम संपल्यानंतर त्याच शेतात आणि त्याच वाफ्यावर दीड फूट अंतरावर झेंडूची लागवड करतो. यामुळे झेंडूचा उत्पादन खर्च कमी राहतो. प्रत्येकी एक एकर या प्रमाणे पिवळा आणि नारंगी रंगाची फूल रोपे १५ ऑगस्ट रोजी लावली आहेत. शेतकरी :  बाळकृष्ण वर्पे गाव :  धामणखेल, ता.जुन्नर, जि. पुणे. एकूण शेती :  ७ झेंडू शेती :   दोन एकर माझ्याकडे सात एकर शेतीमध्ये ऊस, दोडका आणि फुलशेती असे नियोजन असते. गणपतीच्या तारखा लक्षात घेऊन जूनमध्ये आणि नत्ररात्र- दसरा, दिवाळी या सणांची तारीख लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्यात झेंडू लागवडीचे नियोजन असते. याही वर्षी २ एकर झेंडू फुलांची लागवड केली आहे. साडेचार फुटांच्या गादीवाफ्यावर ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटोची लागवड केलेली असते. टोमॅटोचा हंगाम संपल्यानंतर त्याच शेतात आणि त्याच वाफ्यावर दीड फूट अंतरावर झेंडूची लागवड करतो. यामुळे झेंडूचा उत्पादन खर्च कमी राहतो. प्रत्येकी एक एकर या प्रमाणे पिवळा आणि नारंगी रंगाची फूल रोपे १५ ऑगस्ट रोजी लावली आहेत. ...असे आहे व्यवस्थापन रोप लागवडीनंतर तिसऱ्या आणि आठव्या दिवशी खोडाला बुरशी व खोडमाशी लागू नये, यासाठी ह्युमिक ॲसिड आणि बुरशीनाशकांचे ड्रेचिंग केले. या ड्रेचिंगनंतर ११ व्या दिवसांपासून दर चार दिवसांनी १२-६१-०, १२-४८-०, कॅल्शिअम नायट्रेट, मॅग्नेशिअम या विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते. झाडांच्या वाढीबरोबरच कळी धारणा, फुलधारणेच्या टप्प्यांमध्ये १३-४०-१३, १३-०-४५ या खतांची मात्रा दिली जाते. फुलांसह पानांवरील कीड-रोगांचा प्रादुर्भावाकडे लक्ष ठेवून गरजेनुसार फवारणी केली जाते. काढणी व्यवस्थापन फुलांची काढणी साधारण दीड महिन्याने सुरू होते. सध्या फुले काढणीला आली असून, पहिला तोडा सुरू होईल. दर चार ते पाच दिवसांनी एकदा फुले काढणी केली जाते. एका काढणीला सरासरी ५०० किलो फुले निघतात. हा हंगाम दोन ते अडीच महिने असतो. काढणी दरम्यानही विद्राव्य खते दर चार दिवसांनी दिली जातात. विक्री आणि दर व्यवस्थापन आमच्या परिसरातील फुले दादर येथील फुलबाजारात विक्रीसाठी पाठविली जातात. फुलांची दर्जा राखण्यासाठी फुले बारदाण्यामध्ये भरून पाठविण्याऐवजी क्रेटमध्ये पाठवली जातात. बारदाण्यामधील फुले दबली गेल्याने दर कमी मिळतो. सध्या पितृपंधरवड्यामुळे फुलांना चांगली मागणी आहे. दर थोडा कमी १० रुपये प्रति किलो असा असला तरी थोड्याच दिवसात तो वाढले. नवरात्रापासून दसऱ्याच्या दोन तीन दिवस आधीपर्यंत तो ८० ते १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. दिवाळीत तो १२५ ते १५० रुपयेपर्यंतही पोहोचू शकतो. असा दर मागील वर्षी मिळाला होता. झेंडूचा उत्पादन खर्च प्रति किलो ३० रु. पर्यंत होतो. त्यामुळे सरासरी ५० रुपये दर मिळाला तरी पीक फायद्यात राहते. ५० रुपये दर मिळाल्यास एकरी ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळते, असा आजवरचा अनुभव असल्याचे बाळकृष्ण वर्पे यांनी सांगितले. संपर्क : बाळकृष्ण वर्पे, ९५६१८३२२४२  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT