Thrips on onion  
कृषी सल्ला

कांदा पिकातील रोग, कीड व्यवस्थापन

सद्यःस्थितीत हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे लागण झालेल्या कांदा रोपांवरकीड-रोगांच्या प्रादुर्भाव होतो. त्याचा पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.

डॉ. राजीव काळे, डॉ. शैलेंद्र गाडगे

सद्यःस्थितीत हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे लागण झालेल्या कांदा रोपांवर मावा, तुडतुडे व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसत आहे. असे वातावरण कीड-रोगांच्या प्रादुर्भावास अनुकूल ठरते. त्याचा पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.  आयरिश यलो स्पॉट या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिड्यांमार्फत होतो.

लक्षणे पानावर व फुलांच्या दांड्यावर पिवळसर चौकोनी आकाराचे चट्टे पडतात. तेथील पेशी मृत पावल्याने पाने किंवा फुलांचे दांडे कोलमडून पडतात. फुलांच्या दांड्यावर बी लागत नाही. बीजोत्पादनाच्या कांदा पिकावर या रोगाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात होतो. उपाय लागवडीच्या सुरुवातीपासूनच फुलकिड्यांचा बंदोबस्त करावा. पिकाची फेरपालट करूनही हा रोग आटोक्यात आणता येतो. कंद व खोड कूज 

  • रोगकारक सूत्रकृमी - डिटीलिंकस डिपस्यासी (Ditylenchus dipsaci)
  • पिकाच्या सर्व अवस्थेत सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. 
  • लक्षणे  सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे कंद व खोड कुजते. नुकत्याच लावलेल्या रोपांवर प्रादुर्भाव झाल्यास  रोपे खुजी होतात. पाने वाकडी आणि पांढुरकी होतात. कृमी कांद्यात शिरल्याने कांद्याच्या पेशी मऊ होऊन सडतात. कांद्याला घाण वास येतो. रोपे सहज उपटून येतात. कांद्यामध्ये सूत्रकृमी, कंदामधून फुलांचे दांडे आणि बियांपर्यंत पोहोचतात. असे बियाणे वापरले तर सुत्रकृमींचा प्रसार होतो. उपाय खरिपात पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत नुकसान जास्त होते. निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीची निवड करतानाच गादीवाफ्यावर लागवड करावी. तृणधान्यासोबत पिकाची फेरपालट  करावी.

    पिवळा बुटका रोग  या विषाणूजन्य रोगाचा प्रसार मावा या किडीमार्फत होतो. लक्षणे कांद्याची रोपे बुटकी राहतात. पाने वाकडी होऊन पिवळी पडतात. फुलांचे दांडे बारीक राहतात व त्यावरही पिवळेपणा येतो.  उपाय

  • रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत.
  • विषाणू वाहक मावा किडींच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी) प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा कार्बोसल्फान १ मिलि किंवा फिप्रोनील १ मिलि
  • कांदा पिकावरील किडी फुलकिडे (शा. नाव थ्रिप्स टॅबॅसी) सर्व अवस्थेत येणारी व सर्वाधिक नुकसान करणारी प्रमुख कीड. या किडींची कमाल संख्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत असते. ओळख

  • फुलकिडे पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. 
  •  पिल्ले व प्रौढ पानांतील रस शोषतात. किडींनी असंख्य चावे घेतल्याने पानांवर पांढुरके ठिपके पडतात. (त्याला ‘टाक्या’ असेही म्हणतात) असंख्य ठिपके जोडले जाऊन पाने वाकडी होऊन वाळतात. 
  • रोपावस्थेतील प्रादुर्भावामुळे पाने वाळून कांदे पोसत नाहीत. कांदा तयार होत असताना प्रादुर्भाव झाल्यास माना जाड होतात. 
  •  साठवणूकीत कांदा टिकत नाही. फुलकिड्यांनी केलेल्या जखमांतून काळा करपा या रोगांच्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. फुलकिड्यांमुळे कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्के घटू शकते.
  • उपाय

  • कांदा पुनर्लागवडीआधी १५ दिवस शेताच्या कडेने मक्याच्या दोन ओळी लावाव्यात. या सजीव कुंपणामुळे फुलकिड्यांचा उपद्रव कमी होतो. 
  • रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मिलि प्रति लिटर या द्रावणात २ तास बुडवून लागवड करावी.
  • फवारणी :  (प्रति लिटर पाण्यातून)

  • प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा फिप्रोनील १ मिलि स्टिकरसह मिसळून फवारणी करावी. 
  • कीटकनाशकांचा वापर आलटून-पालटून फवारणी करावी. प्रभावी नियंत्रणासाठी किमान ४ ते ५ फवारण्या आवश्यक.
  • एरिओफाइड माईट

  • किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कांद्याची रोपे पूर्णपणे वाकडी होतात. पाने व्यवस्थितपणे उघडत नाहीत. 
  • बहुतेक पानांच्या कडांवर छोटे पिवळे चट्टे दिसून येतात. अशीच लक्षणे लाल कोळीचा प्रादुर्भाव झाल्यास दिसतात. 
  • उपाय 

  • डायकोफॉल २ मिलि किंवा गंधकाची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • - डॉ. राजीव काळे,  ९५२१६७८५८७ - डॉ. शैलेंद्र गाडगे,  ९९२२४९०४८३ (भाकृअनुप - कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

    Agriculture Development: शेतकरी हिताच्या सूचनांना मान्यता कधी?

    Maharashtra Startup Policy: स्टार्ट अप : संधी अन् आव्हाने

    Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन

    Alephata Onion Rate: आळेफाटा येथील उपबाजारात कांदा प्रति क्विंटलला १६०० रुपये

    SCROLL FOR NEXT