फळबागांमध्ये पाचटाचे आच्छादन करावे.
फळबागांमध्ये पाचटाचे आच्छादन करावे. 
कृषी सल्ला

कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ पिके

प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या गुलाबी बोंड अळीच्या सुप्त अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील. सामान्य सल्ला 

  • पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. जेणेकरून आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
  • पिकांना पाणी देताना आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • पिकावर कीटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
  • शेतीकामे करताना गर्दी करणे किंवा एकत्रित काम करणे टाळावे. वापरानंतर शेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीत.
  • शेती कामे करताना सुरक्षित ठेवावे. तोंडाला मास्क किंवा स्वच्छ रुमाल बांधावा. वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणारे रसायन किंवा साबण यांनी हात स्वच्छ धुवावेत.
  • शेतीचे कामे करताना कामगारांना ४ ते ५ फुटाचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य होइल आणि योग्य सामाजिक अंतरही ठेवले जाईल.
  • कापूस 

  • मागील हंगामातील कपाशीची धस्कटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. त्यामुळे त्यावर असलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील.
  • जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या गुलाबी बोंड अळीच्या सुप्त अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील.
  • भुईमूग 

  • शेंगा भरण्याची अवस्था.
  • पिकाच्या गरजेनुसार पाण्याची पाळी द्यावी.
  • साठविलेले धान्य 

  • साठविलेल्या धान्यातील किडींचा प्रादुर्भाव मुख्यत्वेकरून त्यात असलेल्या ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो.
  • साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्के पेक्षा कमी राहील याची काळजी घ्यावी. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे.
  • कांदा 

  • काढणी
  • रब्बी कांद्याचे पीक काढणी अवस्थेत असल्यास, तीन आठवडे आधी पिकाचे पाणी तोडावे.
  • फळ पिके 

  • वाढीची अवस्था.
  • नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या कलमी रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे.
  • फळबागांमधील बाष्पीभवन कमी होण्यासाठी पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. आणि ठिबकद्वारे पाणी द्यावे.
  • भाजीपाला 

  • वाढीची अवस्था
  • शेडनेटमध्ये भाजीपाला उत्पादन करून ठिबकद्वारे पाणी दिल्यास पाण्याची कमतरता असलेल्या भागात सुद्धा चांगले उत्पादन मिळू शकते.
  • भाजीपाला पिकांवरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी)
  • ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनील २.५ मिलि.
  • पशुपालन व्यवस्थापन  तापमान वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान देखील वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरे जास्त पाणी पितात व चारा किंवा खाद्य कमी खातात. याचा एकूणच जनावरांच्या वाढीवर, प्रजननावर व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांची काळजी घ्यावी.

  • कोंबड्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या बाजूने बारदान लावावीत. छतावर वाळलेले गवत किंवा गव्हाच्या काडाचे आच्छादन करावे.
  • तापमानात वाढ होत असल्याने, गाभण जनावरे बाहेर चरावयास सोडू नयेत.
  • विशेषतः उष्ण भागात गाई म्हशींच्या अंगावर गोणपाट टाकून पाणी टाकावे.
  • जनावरांचा गोठा थंड जागी किंवा झाडाखाली बांधावा. गोठ्याच्या छपरावर गवत, पालापाचोळा, नारळाच्या झावळ्या टाकून पाणी शिंपडावे. त्यामुळे गोठा थंड राहतो.
  • जनावरांना ३ ते ४ वेळा थंड व स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे. गोठ्यात पाण्याची स्वतंत्र सुविधा असावी. पाण्याचे भांडे शक्यतो, माती किंवा सिमेंटपासून बनवलेले असावे. जेणेकरून पाणी दिवसभर थंड राहील.
  • दुपारच्या वेळी जनावरांना हिरवा मका, चवळी, कडवळ, लसूण घास द्यावे. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते.
  • उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण होण्यासाठी जनावरांना पुरेसा निवारा उपलब्ध करून द्यावा. गोठा हवेशीर असावा. गोठ्यामधून गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी जागा असावी.
  • संपर्क :  ०२४२६-२४३२३९ (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT