fruit fly on mango
fruit fly on mango 
कृषी सल्ला

कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारी

कृषी विद्या विभाग व ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

नवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी. घन पद्धतीने लागवडीसाठी ५ बाय ५ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. आंबा 

  • फळधारणा
  •  काढणीस तयार असलेल्या चौदा आणे (८० ते ८५ टक्के) आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या साह्याने करावी. आंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यासाठी आंब्याची फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत. तसेच आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. 
  • फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. 
  •  देठकुजव्या आणि फळकूज या काढणीपश्‍चात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आंबा फळांवर होऊ शकतो. त्यापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळे काढणीनंतर लगेच ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. आणि नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये फळे पकिंग करावीत.  
  • मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे आंब्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम  मोठ्या आकाराच्या आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागेतील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी रक्षक फळमाशी सापळे एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे लावावेत. सापळे साधारणपणे जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावा.
  • नवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी. घन पद्धतीने लागवडीसाठी ५ बाय ५ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्डे माती, चांगले कुजलेले शेणखत ३ ते ४ घमेली आणि सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत.   
  • काजू 

  • फळधारणा
  • पूर्ण तयार झालेल्या काजू बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून हवाबंद ठिकाणी साठवणूक करावी.
  • नवीन काजू लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी. 
  • लागवडीसाठी ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावर ०.६ बाय ०.६ बाय ०.६ मीटर आकाराचे खड्डे काढावेत. खड्डे माती, चांगले कुजलेले शेणखत दीड ते २ घमेली आणि सिंगल सुपर फॉस्फेट अर्धा किलो या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत.
  • नारळ 

  • नवीन नारळ लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी. 
  • लागवडीसाठी ७.५ बाय ७.५ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे काढावेत. खड्डे माती आणि चांगले कुजलेले शेणखत १० किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट २ किलो या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत.   
  • सुपारी 

  • नवीन सुपारी लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी. 
  • लागवडीसाठी २.७ बाय २.७ मीटर अंतरावर ०.६ बाय ०.६ बाय ०.६ मीटर आकाराचे खड्डे काढावेत. खड्डे माती, चांगले कुजलेले शेणखत २० किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट अर्धा किलो या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत.
  • चिकू 

  • नवीन चिकू लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी. 
  • लागवडीसाठी १० बाय १० मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे काढावेत. खड्डे माती, चांगले कुजलेले शेणखत ३ ते ४ घमेली आणि सिंगल सुपर फॉस्फेट २.५ किलो या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत.
  • वाल, चवळी 

  • पक्वता
  • वाल पिकाच्या वाळलेल्या शेंगांची तोडणी करून घ्यावी. शेंगा उन्हात ४ ते ५ दिवस चांगल्या वाळवाव्यात आणि मळणी करावी. किंवा शेंगा झाडावर वाळल्यानंतर पिकाची कापणी करून झाडे खळ्यावर ३ ते ४ दिवस उन्हात वाळवावीत आणि नंतर मळणी करावी.
  • साठवणुकीमध्ये भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे मातीच्या खळीचा थर देऊन चांगले वाळवावे.
  • भुईमूग 

  • शेंगा अवस्था 
  • शेंगा भरण्याच्या अवस्थेतील भुईमूग पिकास १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • उन्हाळी भात 

  • फुलोरा ते दाणे भरण्याची अवस्था
  • उन्हाळी भात फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने खाचरात पाण्याची पातळी ५ सेंमीपर्यंत नियंत्रित करावी
  • -   (०२३५८) २८२३८७ (कृषी विद्या विभाग व ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

    Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

    Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

    SCROLL FOR NEXT