Jackfruit Flour Story
Jackfruit Flour Story 
कृषी प्रक्रिया

फणसाचे पीठही बनते, मधुमेहींसाठी जाणून घ्या उपयुक्तता!

टीम ॲग्रोवन

पुणे (वृत्तसंस्था) : फणसाच्या गऱ्यांपासून आणि खाण्यायोग्य बियांपासून जॅम, जेली, फणसपोळी, स्क्वॅश, आणि पल्प बनवता येतात, हे आपल्याला माहीत आहे. पण फणस प्रक्रिया उद्योगाची व्याप्ती इथेच थांबत नाही. कोची येथील जेम्स जोसेफ यांनी ‘जॅकफ्रुट 365’ या नावाने फणसाचे पीठ बाजारात आणले होते. त्याला 2020 मध्ये अमेरिकन डायबेटीक सोसायटीने मान्यताही दिली आहे. ही मान्यता कशासाठी मिळाली होती, त्याबद्दल थोडेसे...

जेम्स जोसेफ यांच्या ‘जॅकफ्रुट 365’ या फणस पिठाचा एका अभ्यासात समावेश करण्यात आला होता. यात सहभागी लोकांना टाईप 2 मधुमेह होता. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार फणसाचे हे पीठ आता मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात ठेवायला मदत करते. मधुमेह (T2DM) असलेल्या या रुग्णांना त्यांच्या रोजच्या आहारासोबत फणसाच्या या पिठाचे सेवन करण्यास सांगण्यात आले.

या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे शास्त्रीय पद्धतीने निरिक्षण करण्यात आले. 40 लोकांचा समावेश असलेल्या या 12 आठवड्यांच्या अभ्यासांती रक्तातील साखर (HbA1c) झपाट्याने घटल्याचे निष्कर्ष समोर आले. जेवणाच्या आधी आणि नंतर घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये या पिठाच्या सेवनामुळे सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले.

प्रतिष्ठेच्या अशा अमेरिकन डायबेडिज असोसिएशनच्या वार्षिक सभेत या अभ्यासातील निष्कर्ष मांडण्यात आले असून संस्थेच्या नियतकालिकातही याला प्रसिद्धी देण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापिठासहीत कित्येक ठिकाणी या अभ्यासाची दखल घेण्यात आली आहे. या पिठाचा मालकी हक्क जोसेफ यांच्याकडे असून कच्च्या फणसापासून (green jackfruit) हे पीठ बनवले जाते.

कच्च्या फणसामध्ये कर्बोदके (carbohydrates) आणि उष्मांक (calories) कमी असतात. तसेच खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर वेगळी होऊन रक्तप्रवाहात किती वेगाने येते, यावर त्या अन्नपदार्थचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ ठरवला जातो. 55 पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर तो मधुमेही व्यक्तींसाठी योग्य समजला जातो. असे निष्कर्ष काढण्यासाठी काम करणाऱ्या सिडनी विद्यापिठाच्या ग्लायसेमिक इंडेक्स रिसर्च सर्व्हिसनुसार (Glycemic Index Research Service) मधुमेहाच्या रुग्णांसाठी या पीठाचे मर्यादित स्वरुपात सेवन उपयुक्त ठरू शकते.

व्हिडीओ पाहा -

आपल्या रोजच्या आहारात फारसा फरक न पाडता मधुमेहाच्या रुग्णांना या पिठाचा आहारात समावेश करता येईल, असेही या सर्व्हिसने सांगितले आहे. त्यातल्या त्यात जीएल कर्बोदकांच्या ऐवजी (GL carbohydrate) आहारात या पिठाचा अंतर्भाव केल्यास उत्तम, असेही सर्व्हिसेसचे म्हणणे आहे. आपल्या आहारात विशेष काही बदल न करता याचा आहारात समावेश करता येईल. चपाती, इडली, किंवा डोसा असे पदार्थ बनवताना नेहमीच्या पिठात फक्त एक चमचा फणस पिठाचा वापर केलेलाही चालतो, असा जोसेफ यांचा दावा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या ‘सोन्या’चे दर कधी वाढणार?

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

SCROLL FOR NEXT