शहरी भागात ज्वारीच्या हुरड्याला जास्त प्रमाणात मागणी आहे
शहरी भागात ज्वारीच्या हुरड्याला जास्त प्रमाणात मागणी आहे 
कृषी प्रक्रिया

ज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले !

डॉ. साधना उमरीकर, डॉ. सचिनकुमार सोमवंशी

भारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा देश आहे. ज्वारीच्या एकूण उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादनाचा वाटा हा भारताचा आहे (संदर्भ एफएओ). भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे (एकूण सरासरी उत्पादन ४९ टक्के). म्हणूनच महाराष्ट्राला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही जिल्हे ज्वारी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. ज्वारीचे आरोग्यविषयक फायदे ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असल्यामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही ज्वारीच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यामुळेच मोठ्या शहरातील हॉटेल्स, धाबे व पर्यटन स्थळे येथे ज्वारीच्या भाकरीच्या मागणीचे प्रमाण वाढते आहे. ज्वारीमधील उपलब्ध पौष्टिक तत्त्वांचे प्रमाण

  • प्रथिने (टक्के) ः ः ११.६
  • स्निग्ध पदार्थ (टक्के) ः ः १.९
  • खनिज पदार्थ (टक्के) ः १.६
  • तंतुमय पदार्थ (टक्के) ः १.६
  • पचनारे तंतुमय पदार्थ (टक्के) ः १२.६९
  • कर्बोदके (टक्के) ः ७२.६
  • ऊर्जा (मिलीग्रॅम/१०० ग्रॅम) ः ३४९
  • कॅल्शियम (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः २९
  • फॉस्फरस (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः २२५
  • लोह (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः ४.१
  • केरोटीन (प्रो व्हिटामिन ए) ः ४७
  • थायमिन ः ३७  
  • ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची असते. आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) आठ ते दहा टक्के असतो.
  • ज्वारीमध्ये कर्बोदके, ऊर्जा, तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे ती शक्तीवर्धक आणि पचण्यास सुलभ आहे.
  • ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स (रक्तातील साखरेची पातळी वाढविण्याची क्षमता) कमी असल्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी ज्वारीचे सेवन फायदेशीर ठरते.
  • ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, कॉपर, नायसिनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यात अँटी ऑक्सिडंटसचे प्रमाण असल्यामुळे हृदय विकार, कर्करोग यासारख्या आजारांवर ज्वारीच्या सेवनाने लाभ होतो.
  • ज्वारीचा हुरडा ज्वारीचा हुरडा हा अत्यंत स्वादिष्ट, रुचकर व लोकप्रिय पदार्थ आहे. डिसेंबर महिन्यात ज्वारी हुरड्यात यायला सुरवात होते. हा हुरडा कोवळा असताना खातात. ग्रामीण भागातून, कृषी पर्यटन स्थळे व मोठमोठ्या हॉटेल्स मधून हुरड्याला अत्यंत मागणी असते. हुरडा रुचकर लागण्याचे कारण म्हणजे कोवळ्या अवस्थेत या दाण्यांमध्ये मुक्त अमीनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

    कोवळ्या दाण्यांमध्ये पिष्ठमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. असे दाणे भाजल्यावर ते अत्यंत रुचकर लागतात. यात मीठ साखर, लिंबू घालून शेंगदाणे किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत अथवा गुळासोबत खायला दिल्यास त्याची चव द्विगुणित करता येते. हुरड्याबरोबर लिंबाच्या सेवनाने ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढून लोहाचे शोषण सुलभतेने होते. हुरड्याच्या कोवळ्या दाण्यांची परिपूर्ण वाढ झाल्यावर त्याला जोंधळा म्हणतात. हुरड्यासाठी ज्वारीच्या महत्त्वाच्या जाती ज्वारीच्या चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार बियाणे, अधिक उत्पन्न देणाऱ्या नवनवीन जातींची लागवड करणे आवश्यक आहे.

  • खरीप हंगामातील अकोला वाणी, अकोला अश्विनी आणि अकोला कार्तिकी या जाती तर रब्बी पारंपरिक हंगामातील गूळभेंडी, सुरगी, कुचकुची या स्थानिक जाती हुरड्यासाठी लोकप्रिय आहेत.
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एस. जि. एस. ८४ या जातीची खास हुरड्यासाठी शिफारस केली आहे.
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या विविध जातीमधील फुले मधुर, फुले उत्तरा या शिफारसप्राप्त जाती हुरड्यासाठी लोकप्रिय होत आहेत. फुले मधुर व फुले उत्तराची वैशिष्ट्ये
  • या वाणांचा हुरडा अतिशय रुचकर व गोड आहे.
  • कोवळ्या अवस्थेतील दाणे हिरवीगार व दुधाळ असून याची कणसे भरदार आहेत, तसेच कणसातील दाणे सुलभतेने बाहेर पडतात. हा हुरडा ९० ते १०० दिवसांत तयार होतो. याच्या एका कणसापासून अंदाजे ७०-९० ग्रॅम दाणे मिळतात. यांची ताटे ही गोड असल्यामुळे जनावरांसाठीदेखील चांगल्या प्रकारचा कडबा मिळतो.
  • संपर्क ः डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT