products of gulkand
products of gulkand 
कृषी प्रक्रिया

पदार्थाच्या मूल्यवर्धनासाठी गुलकंदाचा वापर

वैद्य महेंद्र तोष्णीवाल, प्रा. रामेश्वर जाजू

गुलाब हे फूल म्हणून प्रसिद्ध आहेच त्याच बरोबरीने गुलाबाचा उपयोग गुलकंद, गुलाबपाणी, अत्तर, गुलाब तेल, उदबत्ती बनविण्यासाठी केला जातो. गुलाबाच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे गुलकंदाचा उपयोग विविध पदार्थांमध्ये करून पदार्थाचे मूल्यवर्धन करता येते. गुलाब हे जसे सर्वांना आवडणारे फूल आहे तसेच ते औषधी गुणधर्माने युक्त आहे. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’, चवीला अप्रतिम आणि आरोग्याला हितकारी आहे. गुलाबाच्या झाडाचे तीन मुख्य प्रकार पडतात : देशी, रानटी आणि कलमी. गुलकंद व गुलाबजल तयार करण्यासाठी प्रामुख्याने देशी प्रजातीचेच गुलाब लागतात; कारण देशी गुलाबांना जेवढा सुगंध असतो, त्या प्रमाणात विदेशी गुलाबांना नसतो. भारत गुलाब निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. उन्हामुळे पित्त, जळजळ, उष्माघात यासारखे आजार उद्भवू शकतात त्यासाठी बाजारातील शीतपेयं घेण्यापेक्षा तृष्णाशामक गुलकंदच हे उत्तम पर्याय आहे. गुलकंदाचे फायदे

  • शरीरात थंडावा निर्माण करण्याचं काम करतो.
  • गुलकंद हे एक उत्तम पाचक आहे. उष्णतेपासून होणारे विकार, ताप, रक्तपित्त, कांजिण्या, शारीरिक दौर्बल्यावर उपचारासाठी गुलकंदाचा चांगला उपयोग होतो. 
  • गुलकंद कांतिदायक तृष्णाशामक आहे.
  • डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो.
  • गुलकंदामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो
  • वाढत्या वयाची मुले आणि शारीरिक दौर्बल्य असलेल्यांना दिल्यास ते शक्तिवर्धक म्हणून काम करते.
  • गुलकंद बनवण्याची प्रक्रिया

  • गुलकंद बनवण्यासाठी देशी जातीचे गुलाब वापरावे. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेली गुलाब वापरू नयेत.
  • कृती

  • गुलाबाच्या पाकळ्या हळुवारपणे धुऊन घेऊन त्यावरील पाणी कोरडे होण्यास थोडा वेळ ठेवावे.
  • पाकळ्यांचा थोडा थोडा काप करून त्याचा थर पातेल्यामध्ये मध्ये टाकावा.
  • गुलाबाच्या पाकळ्या व साखर समप्रमाणात घेऊन त्याचा एकावर एक थर घालून घ्यावा.
  • त्यावर थोडे मधाचे आवरण टाकून ते मिश्रणात एकजीव होईल याची खात्री करावी.
  • परत याच पद्धतीने सर्व गुलाबाच्या पाकळ्या संपेपर्यंत त्यावर समप्रमाणात साखर व मध यांचे थर द्यावेत.
  • पातेले व्यवस्थितपणे झाकून दिवसा सूर्याच्या प्रकाशात व रात्री सावलीत २ आठवडे या कालावधीसाठी ठेवावे.
  • रोज दिवसातून एकदा चमच्याने ढवळून घ्यावे.
  • सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे गुलाबाच्या पाकळ्या साखरेच्या पाकात पूर्ण विघटित होतात व गुलकंदाला लाल रंग येतो.
  • याची साठवणूक जार मध्ये किंवा फ्रीजमध्ये करता येते.
  • गुलकंदाचा अन्य पदार्थामध्ये उपयोग गुलकंद शेक साहित्य

  • गुलकंद (२ चमचे), साखर (१ चमचा), काजू किंवा बदाम (गरजेप्रमाणे), दुध (१ ग्लास), रोझं इसेन्स (गरजेप्रमाणे).
  • थोडे दूध, गुलकंद आणि काजू व बदाम एकत्र मिक्सरमध्ये टाकून बारीक होईपर्यंत फिरवून घ्यावे.
  • गरजेप्रमाणे इसेन्स व साखर मिसळून ढवळावे.
  • सर्व मिश्रण परत एकदा मिक्सर मधून व्यवस्थित फिरवावे. गुलकंद शेक तयार होईल.
  • गुलकंद श्रीखंड साहित्य

  •  चांगल्या प्रतीचा चक्का, पिठीसाखर, दोन चमचे गुलकंद, वेलदोडा पावडर, सजावटीसाठी काजू ,बदामची पूड व बेदाणे.
  • चक्का व साखर एकत्र करून चांगले फेटून घेऊन मिक्सर अथवा बारिक चाळणीतून गाळून घ्यावे.
  • मिश्रणातील बारीक बारीक गुठळ्या मोकळ्या होऊन मिश्रण एकजीव होईल याची काळजी घ्यावी.
  • या मिश्रणामध्ये गुलकंद, वेलची पूड, सुकामेवा व बेदाणे घालून एकत्र करावे.
  • गुलकंद बर्फी साहित्य

  • खवा (१ कप), साखर (अर्धा कप), गुलकंद (३ चमचे), तूप (१ चमचा)
  • सुरुवातीला अर्धा चमचा तूप पॅनमध्ये गरम करून त्यात खवा मंद आचेवर भाजून घ्यावा.
  • त्या मिश्रणात अर्धा कप साखर घालून एकजीव करून घट्ट होऊ द्यावे व गॅस बंद करावा.
  • तयार मिश्रणातील एक तृतीयांश मिश्रण काढून घ्यावे व त्याला तुपाचा हात देऊन थापावे आणि थोडे थंड होऊ द्यावे.
  • राहिलेल्या दोन तृतीयांश खव्यात ३ चमचे गुलकंद टाकून ते एकजीव करून मध्यम आचेवर अल्प वेळेसाठी परतून घ्यावे. ते मिश्रण हाताळण्यायोग्य झाले की, थापलेल्या खव्याच्या वर त्याच आकारात गुलकंदयुक्त खवा थापावा.
  • तयार झालेले मिश्रण थंड करून त्याच्या वड्या कराव्यात.
  • संपर्क- वैद्य महेंद्र तोष्णीवाल (९८५०२२९९९४) (सी.एस.एम.एस.एस. आयुर्वेदिक महाविद्यालय, कांचनवाडी जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

    Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

    Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

    Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

    Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

    SCROLL FOR NEXT