value added products of phalsa
value added products of phalsa 
कृषी प्रक्रिया

फालसापासून जाम, जेली, चटणी

पल्लवी कांबळे, अमरसिंह सोळंके

फालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व अ आणि क, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, सोडिअम मुबलक प्रमाणात असतात. या फळामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात. फालसापासून सरबत, जाम, जेली, चटणी असे विविध मूल्यवर्धित पदार्थ केले जातात. मूल्यवर्धित पदार्थ सरबत  साहित्य  फालसा अर्धा किलो, साखर २०० ग्रॅम, पाणी ३५० मिलि, सोडा-पाणी, बर्फाचे तुकडे. कृती

  • प्रथम साखर आणि पाणी एकत्र करून मंद आचेवर उकळून घेऊन सिरप तयार करावे. तयार सिरपमध्ये फालसा फळे टाकावीत. हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून घ्यावे. तयार सरबतामध्ये सोडा पाणी आणि बर्फाचे तुकडे टाकून सेवन करावे.
  • फालसा फळ मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्यावा. त्यामध्ये ५ मिनिटे उकळलेला सिरप टाकावा. त्यात सोडा-पाणी आणि बर्फाचे तुकडे टाकून सरबत तयार करावा.
  • चटणी  फालसा फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. पॅनमध्ये पाणी टाकून फळे ४-५ मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यावीत. शिजल्यानंतर मिश्रण थंड होण्यास ठेवावे. थंड झाल्यावर मिश्रण गाळून घ्यावे (गाळलेले पाणी कोणत्याही फळाच्या रसामध्ये वापरता येते). फालसा फळे मिक्सरमध्ये टाकून बारीक पेस्ट करावी. पेस्टमध्ये आधी गाळून बाजूला ठेवलेले पाणी घालावे. पुन्हा हे मिश्रण चाळणीतून गाळून घ्यावे. गाळलेले मिश्रण मंद आचेवर भांड्यामध्ये ठेवावे. त्यामध्ये साखर, गूळ, काळे मीठ, जिरे पावडर, व्हिनेगार घालून मंद आचेवर सतत ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊन गॅस बंद करावा. तयार चटणी थंड करून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात १४ ते १५ दिवस ठेवावी. जेली  फालसा फळे हलके बारीक करून मंद आचेवर २० मिनिटे शिजवावीत. मंद आचेवर भांड्यात रस आणि पेक्टीन टाकून सतत ढवळत राहावे. मिश्रण थोडे उकळल्यावर त्यात साखर घालावी. मिश्रणाचा फेस जाईपर्यंत चांगले शिजवून घ्यावे. शेवटी ड्रॉप टेस्ट घेऊन गॅस बंद करावा. तयार जेली भरणीमध्ये हवाबंद करून ठेवावी. जाम फालसा फळे चांगली धुऊन गरम पाण्यात ५ मिनिटे उकडून घ्यावीत. उकडल्यानंतर मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्यावे. गाळलेले मिश्रण भांड्यात घेऊन मंद आचेवर सतत ढवळत राहावे. थोडे उकळल्यानंतर त्यात साखर घालावी. थोडे शिजल्यावर त्यात लिंबाचा रस टाकावा. जाम तयार होण्यासाठी मिश्रण चांगले शिजवून घ्यावे. मिश्रणाचा १ थेंब थंड पाण्यात टाकावा, गुठळी झाल्यास गॅस त्वरित बंद करावा. तयार फालसा जाम निर्जंतुक कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवावा. काळजी  फालसाचे फळ जास्त प्रमाणात सेवन केल्याने पित्त किंवा पोटफुगी त्रास जाणवतो. संपर्क - अमरसिंह सोळंके, ९९२१०९२२२२ (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

    Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    SCROLL FOR NEXT