preparation of squash and juice from jamun
 preparation of squash and juice from jamun 
कृषी प्रक्रिया

जांभळापासून सरबत, स्क्वॅश निर्मिती

आयेशा शेख, किशोर शेडगे

आरोग्यदायी गुणधर्मामुळे जांभळाची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र, हे फळ हंगामी असल्यामुळे वर्षभर त्याची उपलब्धता होऊ शकत नाही. उपलब्ध असताना या फळापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करून ठेवल्यास वर्षभर वापरणे शक्य होते. या प्रक्रिया पदार्थांनाही चांगली मागणी असून, ग्रामीण पातळीवर उत्तम प्रक्रिया उद्योग उभारता येऊ शकतो. जांभूळ झाडे (शा. नाव - सायझिजियम क्युमिनी) मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळतात. आयुर्वेदिक दृष्टीने त्याचे विविध भाग उपयुक्त आहेत. याची लहान आकाराची जांभळ्या रंगाची फळे गोड, तुरट चवीमुळे लहानथोरांना आकर्षित करतात. जांभळाचे गुणधर्म

  • जांभळामध्ये मधुमेहरोधक गुणधर्म आहेत. त्यात असलेल्या अल्कालॉईड्समुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो. परिणामी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते.
  • जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब कमी होतो. त्वचेसंबधीचे आजार असल्यास जांभळाचा ज्युस उपयुक्त ठरतो.
  • जांभळात फ्लॅवोनाइड्स भरपूर प्रमाणात असून, अधिक प्रमाणात फिनॉलिक संयुगे असतात. ही संयुगे आरोग्यासाठी उत्तम असून, अँटीऑक्सिडेंट् म्हणून काम करतात.
  • पचन संस्था सुरळीत करण्यासाठी आणि अनेक पोटाच्या विकारावर जांभूळ उपयुक्त ठरते.
  • जांभळाच्या बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर आणि मूत्रविकारातील संसर्ग दूर करण्यास फायदेशीर आहे.
  • जांभळात पोटॅशिअम मुबलक असल्यामुळे हृदयविकारावर फायदेशीर ठरते. जांभळामध्ये अ आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, प्रथिने, ग्लुकोज आणि कर्बोदके असतात.
  • प्रक्रियायुक्त पदार्थॉ रस

  • जांभळापासून रस काढण्यासाठी पिकलेली चांगली फळे घ्यावीत. ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर फळापासून बिया वेगळ्या कराव्यात. बिया वेगळ्या केल्यानंतर जांभळाचे मिश्रण एका पातेल्यामध्ये घ्यावे. पातेले मंद आचेवर ठेवावे. ८० अंश सेल्सिअस तापमानाला २० मिनिटे गरम करावे.
  • हे मिश्रण एका स्वच्छ तलम कापडामध्ये घेऊन गाळून घ्यावे. गाळल्यानंतर रसाची साठवण स्टीलच्या भांड्यामध्ये करावी. दीर्घकाळ साठवण्यासाठी बाटल्या व त्यांची झाकणे उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे ठेवून निर्जंतुक करून घ्याव्यात. बाटल्या कोरड्या कराव्यात. त्यात रस भरल्यानंतर निर्जंतुक केलेली झाकणे यंत्राच्या साहाय्याने घट्ट बसवून हवाबंद करावीत. या बाटल्या ८० अंश सेल्सिअस तापमानास गरम पाण्यात २५ ते ३० मिनिटे ठेवाव्यात.
  • या कालावधीनंतर बाटल्या बाहेर काढून त्या थंड होण्यासाठी उघड्यावर ठेवाव्यात. हा रस विविध प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरता येतो.
  • उदा. सरबत, स्क्वॅश, आले अधिक जांभूळ अधिक साखर.
  • स्क्वॅश स्क्वॅश तयार करण्यासाठी २० टक्के रस, ४५ टक्के साखर, १ टक्के आम्लता लागते. घटक जांभळाचा रस १ लिटर, साखर २ किलो, पाणी १ लिटर, पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट २ ग्रॅम.

  • वरीलप्रमाणे सर्व घटक घ्यावेत. एक लिटर पाणी स्टीलच्या भांड्यात घ्यावे. मंद आचेवर शेगडीवर ठेवावे. त्यात साखर विरघळून घेऊन थंड करावी.
  • त्यानंतर त्यात जांभळाचा १ लिटर रस आणि पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट २ ग्रॅम मिसळून चांगले ढवळून घ्यावे.
  • हे मिश्रण निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून कोरड्या जागी ठेवावे.
  • स्क्वॅशमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने वापरताना त्यामध्ये १:३ प्रमाणात पाणी मिसळावे. म्हणजेच १०० मिली स्क्वॅशमध्ये ३०० मिली पाणी मिसळून घ्यावे.
  • सरबत 

  • १ लिटर जांभळाच्या रसापासून ८ लिटर सरबत (आर.टी.एस.) तयार होतो.
  • एका पातेल्यात ८ लिटर पाणी घेऊन त्यात १.३ किलो साखर मिसळून घ्यावे. हे मिश्रण मंद आचेवर शेगडीवर साखर विरघळेपर्यंत ठेवावे. या तयार द्रावणामध्ये जांभळाचा रस ५०० मिली मिसळावा. व्यवस्थित मिश्रण करून निर्जंतुक करून थंड करावे. थंड केलेल्या मिश्रणाची कोरड्या जागी साठवण करावी. यामध्ये ५ टक्के रस, १५ टक्के साखर व ०.२५ टक्के आम्लता असते.
  • संपर्क- आयेशा शेख, ९०४९१०१३७५ किशोर शेडगे, ८९८३६९५७४८ (साहाय्यक प्राध्यापक, अन्न तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, आचळोली, महाड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT