राजगिरा
राजगिरा  
कृषी प्रक्रिया

आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिरा

एस. डी. कटके

धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे तिपटीने अधिक असते. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते. राजगिऱ्यात विशेषतः प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये यांचे प्रमाण भरपूर आहे. राजगिऱ्यात असणाऱ्या कॅल्शिअमचे प्रमाण पारंपरिक तृण धान्यांपेक्षा साधारणपणे १० पट जास्त आहे. 

राजगिऱ्याच्या पानांचा आणि धान्याचा आहारात समावेश करण्यात येतो. राजगिऱ्याच्या पानांचा पालेभाजी म्हणून वापर करतात; तर धान्याचा उपयोग भाजून, लाह्या करून किंवा पीठ करून करता येतो. राजगिऱ्याचे दाणे बारीक आणि पांढऱ्या रंगाचे असतात. त्यापासून तयार केलेल्या पदार्थांना रंगही चांगला दिसतो.  राजगिरा पौष्टिक आहे शिवाय त्यामध्ये ग्लुटेन नसते. त्यामुळे ज्यांना गव्हाची अॅलर्जी आहे त्या व्यक्तींसाठी राजगिरा हा एक उत्तम पर्याय आहे. इतर पारंपरिक धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यात विशेषतः प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये यांचे प्रमाण भरपूर आहे. राजगिऱ्यात असणाऱ्या कॅल्शिअमचे प्रमाण पारंपरिक तृण धान्यांपेक्षा साधारणपणे १० पट जास्त आहे; तर लोहाचे प्रमाण ५ पट जास्त आहे.  

पोषकता 

  •  कॅल्शिअम घटक मुबलक असतात. त्यासोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फोलिक अ‍ॅसिड आणि लोहदेखील मुबलक आढळते.
  •  सोल्युबल फायबर, प्रोटीन आणि झिंक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
  •  लोह मुबलक असल्याने अ‍ॅनिमियाचा त्रासही आटोक्यात राहतो.
  •  धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम तिपटीने अधिक असते. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते. तसेच ऑस्टोपोरायसिसचा धोका आटोक्यात राहतो. 
  • यातील तेल आणि फायटोस्टेरॉल घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळीही कमी करते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • केस अकाली पांढरे होण्याची समस्या आटोक्यात राहते. यातील लाएसिन घटक केसांना मुळापासून बळकट बनवतात. तसेच सिस्टीन घटक केसांना आवश्यक असणारे प्रोटीन घटक मिळवून देण्यास मदत करतात.
  •  यातील पेप्टाइड्स घटक दाह कमी करतात; तसेच वेदना कमी करण्यास फायदेशीर ठरतात. 
  • लाडू व चिक्की     पॅन गरम झाले की एक दोन चमचे राजगिरा त्यावर टाकत तो चांगला फुलेपर्यंत हलवीत राहावे. फुललेला राजगिरा एका भांड्यात काढावा.  चाळणीने चाळून न फुललेला राजगिरा वेगळा करावा. पॅनमध्ये तूप टाकावे, ते गरम झाले की त्यात गूळ टाकावा, गूळ हळूहळू वितळायला लागेल. गूळ पूर्ण वितळला की त्यात थोडे पाणी टाकून चाचणी तयार करावी.    तयार चाचणीला राजगिऱ्यामध्ये मिसळावे. काजूचे तुकडे चांगले मिसळून घ्यावेत. हातांना थोडे पाणी लावून गरम गरम मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्यावा किंवा रिफाइंड तेलाचा हात फिरवलेल्या ट्रे मध्ये हे मिश्रण काढून, सपाट करून वड्या पाडाव्यात.

    लाही     राजगिरा स्वच्छ करून गरम झालेल्या कढईत थोडेथोडे राजगिरा भुरभुरत टाकीत जावे. लगेच कढईत लाह्या फुटतात. राजगिऱ्याचे सोनेरी दाणे फुलून पांढरे शुभ्र झाले म्हणजे छान लाही तयार झाली असे समजावे.     लाही तयार होताच त्वरित कढईच्या बाहेर काढावे; अन्यथा लगेच त्या काळ्या पडून जळायला लागतात. या लाह्या पचावयास अत्यंत हलक्या आणि पौष्टिक असतात.

    भाकरी     राजगिरा स्वच्छ करून पीठ दळून आणावे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, भगर या धान्यांच्या पिठामध्ये राजगिऱ्याचे पीठ मिसळावे. ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठाची भाकरी करतो त्याप्रमाणे राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी करावी. पीठ भिजविण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. राजगिऱ्याची भाकरी खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असते.

    मुटके     राजगिऱ्याची पाने व कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी. सर्व पीठे आणि उर्वरित साहित्य तसेच राजगिरा पाने, कोथिंबीर, मोहन आणि पाणी टाकून घट्ट मऊसर पीठ मळून घ्यावे.भिजवलेल्या पिठाचे मुटके बनवून घ्यावेत. पातेल्यात पाणी उकळावे. पातेल्यावर स्टीलच्या चाळणीला तेल लावून तयार केलेले मुटके वाफावण्यास ठेवावेत. मुटके शिजल्यावर त्यावर आवडत असेल तर मोहरी, जिरे आणि कढीपत्त्या‍ची फोडणी टाकावी.

    शिरा     तूप घालून राजगिरा पीठ भाजून घ्यावे. पाणी टाकून वाफवून त्यात साखर मिसळावी. वाफवलेला स्वादिष्ट राजगिऱ्याचा शिरा तयार करावा.

    पौष्टिक खीर     तूप घालून राजगिरा पीठ भाजून घ्यावे. त्यात गरम दूध मिसळून शिजवून घ्यावे. नंतर साखर मिसळून शिजवावे.  विलायची पूड; तसेच आवडीप्रमाणे सुकामेवा मिसळावा. पौष्टिक खीर तयार होते.

    पौष्टिक मूल्य (प्रति १०० ग्रॅम)  ऊर्जा ३६४ किलो कॅलरी, प्रथिने १६.५ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ५.३ ग्रॅम, तंतुमय पदार्थ २.७ ग्रॅम, कर्बोदके  ६२.७ ग्रॅम, खनिजद्रव्ये ३.५ ग्रॅम, कॅल्शिअम २२३ मि.ग्रॅम, लोह १७.६ मि.ग्रॅम, मॅग्नेशिअम ११० मि.ग्रॅम, सोडिअम ६.० मि.ग्रॅम, पोटॅशिअम  ३०४ मि.ग्रॅम, झिंक २.१ मि.ग्रॅम, कॅरोटीन ४० मि.ग्रॅम, थायमिन ०.४० मि.ग्रॅम, रायबोफ्लेविन ०.१५ मि.ग्रॅम, नायसिन १.१ मि.ग्रॅम, फॉलिक अॅसिड १५.३ मि.ग्रॅम.

    - एस. डी. कटके, ९९७०९९६२८२  अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT