पारंपरिक पदार्थांमध्ये वाळलेल्या आणि पावडर धिंगरी अळिंबीचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांकरिता अळिंबी सर्वांनाच परिचित आहे. परंतु अल्प टिकवणक्षमता, अनियमित उपलब्धता आणि जास्त उत्पादन खर्चामुळे त्यांचा वापर मर्यादित राहिला आहे. दैनंदिन आहारात चव, पोषण वाढविण्यासाठी अळिंबीचा वापर करता येतो. पारंपरिक पदार्थांमध्ये वाळलेल्या आणि पावडर धिंगरी अळिंबीचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांकरिता अळिंबी सर्वांनाच परिचित आहे. परंतु अल्प टिकवणक्षमता, अनियमित उपलब्धता आणि जास्त उत्पादन खर्चामुळे त्यांचा वापर मर्यादित राहिला आहे. दैनंदिन आहारात चव, पोषण वाढविण्यासाठी अळिंबीचा वापर करता येतो. अळिंबीच्या मूल्यवर्धित उत्पादनांचा आहारात वापर करावा. मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीतून उद्योजकता निर्माण करता येतील. त्यामुळे मूल्यवर्धनाचे तंत्रज्ञान शालेय पोषण कार्यक्रमांतर्गत घेतल्यास पोषण वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील महिलांचे उत्पन्न वाढीस लागण्यास मदत होईल. अळिंबी पास्ता अळिंबी पास्ता किंवा नूडल्स हे खाण्यासाठी तयार पदार्थांमध्ये येतात. हे पदार्थ बनविताना अळिंबीचा वापर केल्यास त्यांची चव आणि पौष्टिकता अधिक वाढते. हे दोन्ही पदार्थ तयार करण्यासाठी एक्सटूडर नावाच्या यंत्राचा वापर केला जातो. साहित्य पास्ता : अळिंबी पावडर २०० ग्रॅम, बारीक रवा ८०० ग्रॅम. नूडल्स : अळिंबी पावडर २००, गव्हाचे पीठ ८०० ग्रॅम. कृती पास्ता किंवा नूडल्स तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य एकत्र मिसळून त्यामध्ये कोमट पाणी घालावे. पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे. एक्सटूडर यंत्रामध्ये तयार कणीक घालून पास्ता किंवा नूडल्स बनवावेत. तयार पास्ता किंवा नूडल्स वाळवून पाकिटामध्ये हवाबंद करावेत. अळिंबी चिप्स चिप्ससाठी ताजी बटण अळिंबी धुऊन त्याचे २ मिमी जाडीचे काप करावेत. अळिंबी काप २ टक्के मिठाच्या द्रावणामध्ये ब्लांच करावेत. नंतर त्यामध्ये सायट्रिक आम्ल (०.१ टक्का), मीठ (१.५ टक्का) आणि मिरची पावडर (०.३ टक्का) मिसळून रात्रभर ठेवावे. द्रावणातून बाहेर काढल्यानंतर अळिंबी काप कॅबिनेट ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानात ८ तास वाळवावेत. नंतर मंद आचेवर तेलामध्ये वाळलेले काप तळून घ्यावेत. तयार अळिंबी चिप्समध्ये आवडीनुसार मसाले मिसळावेत. तयार चिप्स पॉलिप्रोपिलिनच्या पाकिटामध्ये भरून हवाबंद करावेत. अळिंबी मुरंबा मुरंबा तयार करण्यासाठी ताजी बटन अळिंबी वापरली जाते. त्यासाठी अळिंबीची प्रतवारी करून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. अळिंबीस सुई किंवा टाचणीने छिद्रे पाडून घ्यावीत. त्यानंतर अळिंबी पोटॅशिअम मेटाबायसल्फेट (केएमएस) ०.०५ टक्क्याच्या द्रावणामध्ये १० मिनिटे उकळून घ्यावी. यानंतर सलग तीन दिवस अळिंबीच्या वजनाच्या ४० टक्के साखरेच्या पाकासोबत प्रक्रिया करावी. तीन दिवसानंतर अळिंबी पाकातून बाहेर काढावी. हा पाक साखरेचा राहिलेला ४० टक्के भाग आणि ०.१ टक्का लिंबू रसामध्ये उकळून घ्यावे. त्याचा ब्रिक्स ६५ अंश सेल्सिअस येईपर्यंत चांगले उकळून घ्यावे. तयार मिश्रणात अळिंबी टाकावी. तयार मुरंबा अत्यंत चांगल्या प्रतीचा असतो. लोणचे सुरुवातीला बटण अळिंबी चांगली धुऊन घ्यावी. लोणच्यासाठी पूर्ण अळिंबी किंवा अळिंबीचे काप वापरावेत. अळिंबी पोटॅशिअम मेटाबाय सल्फेट ०.०५ टक्क्याच्या द्रावणामध्ये ५ मिनिटे उकळून घ्यावी. त्यानंतर अळिंबी लगेच २ ते ३ वेळा थंड पाण्यातून धुवून काढावी. नंतर अळिंबीला तिच्या वजनाच्या १० टक्के मीठ चोळून रात्रभर तसेच ठेवून द्यावी. दुसऱ्या दिवशी अळिंबीमधून बाहेर पडलेले जास्तीचे पाणी काढून टाकावे. अळिंबीमध्ये चवीप्रमाणे मसाले आणि संरक्षक (प्रीझर्व्हेटिव्ह) मिसळावीत. एक किलो अळिंबीसाठी काळी मिरपूड ३५ ग्रॅम, हळद २० ग्रॅम, काळी मोहरी १० ग्रॅम, लाल तिखट १० ग्रॅम, जिरे पावडर १.५ ग्रॅम, मेथी बी किंवा पावडर १० ग्रॅम, बडीशेप पावडर १.५ ग्रॅम, अजवाइन १० ग्रॅम, काळोंजी १० ग्रॅम, मोहरीचे तेल २०० मिलि आणि मीठ ९० ग्रॅम घ्यावे. हे सर्व साहित्य अळिंबीमध्ये चांगले मिसळून घ्यावे. नंतर मर्यादित स्वरूपात ॲसिटिक आम्ल आणि सोडिअम बेन्झोएट ही संरक्षके वापरावीत. तयार लोणचे निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे. हे लोणचे १ वर्षापर्यंत चांगले राहते. अळिंबी करी साहित्य कांदा ५१० ग्रॅम, लसूण २५० ग्रॅम, आले २०० ग्रॅम, लाल तिखट १५० ग्रॅम, कढीपत्ता १०० ग्रॅम, हिरवी मिरची २५० ग्रॅम, तेल ४०० मिलि, मीठ १६० ग्रॅम, पाणी १ लिटर. कृती सुरुवातीला मंद आचेवर तव्यामध्ये तेल गरम करावे. गरम तेलात कांदा आणि हिरवी मिरची सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावी. लसूण-आल्याची पेस्ट करून ती तेलामध्ये परतून घ्यावी. त्यानंतर कढीपत्ता, मीठ आणि तिखट घालून फोडणी द्यावी. मसाल्यांच्या मिश्रणात पाणी मिसळून ते मंद आचेवर घट्ट होईपर्यंत उकळून घ्यावे. रेटॉर्ट पाऊचमध्ये १०० ग्रॅम तुकडे अळिंबी भरून त्यामध्ये ५० ग्रॅम करी टाकून चांगले मिसळून घ्यावे. नंतर पाऊच हवाबंद करून १२१ अंश सेल्सिअस तापमानात ४५ मिनिटे उष्णता प्रक्रिया करून ताबडतोब थंड करावे. तयार अळिंबी करी चवीला उत्तम लागते. निर्जलीकरण केलेली धिंगरी किंवा बटन अळिंबीपासून देखील अळिंबी करी करता येते. अळिंबी पापड साहित्य अळिंबी पावडर १५० ग्रॅम, उडीद किंवा मूगडाळ पीठ ८०० ग्रॅम, जिरे पूड ५० ग्रॅम, लाल तिखट १५ ग्रॅम, मिरी पूड १५ ग्रॅम, मीठ २० ग्रॅम, तेल १०० ग्रॅम, खाण्याचा सोडा १० ग्रॅम, हिंग १ ग्रॅम. कृती प्रथम अळिंबी पावडर आणि डाळ पीठ चांगले मिसळून घ्यावे. त्यामध्ये वरील साहित्य मिसळून पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्यावी. तयार कणकेचे पापड लाटून ते उन्हामध्ये किंवा सावलीत वाळवावे. तयार पापड प्लॅस्टिक पाकिटामध्ये भरून हवाबंद करावेत. गुणवत्ता हमी
- डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११ (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.