Health benefits of turmeric mixed milk
Health benefits of turmeric mixed milk 
कृषी प्रक्रिया

आरोग्यदायी हळद मिश्रित दूध

नेहा गोडसे, अमृता राजोपाध्ये-कुलकर्णी

हळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते. जखमेवर उपचार तसेच हळद मिसळलेले दूध प्यायल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार लगेच बरे होतात. आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमिनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपित करणारी आहे. त्वचेचा रंग उजळतो. रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते. रोजच्या आहारात नियमितपणे वापर केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. हळदीत नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले कुरक्युमीन रसायन अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. फायदे 

  • सर्दीच्या समस्येवर हळद मिश्रित दूध हा चांगला उपाय आहे.
  • आले आणि एक चमचा हळदीच्या मिश्रणात मध मिसळून प्यायल्याने सर्दी -खोकला बरा होण्यास मदत मिळते.
  • हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्याने घशातील खवखव कमी होते. या दुधामुळे श्‍वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते.
  • हळद मिश्रित दुधामुळे यकृत मजबूत होते. यकृताशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे दूध उत्तम उपाय आहे.
  • हळद मिश्रित दुधामध्ये ‘अँटिऑक्सिडंट’ गुणधर्म अधिक असल्याने डोकेदुखी व अंगदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.
  • यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात. हळद मिश्रित दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात. तसेच वेदना कमी झाल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.
  • यामध्ये अँटिव्हायरल गुणधर्म असल्याने शरीरातील जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिबंध होतो. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारल्याने यकृतावर होणारा जंतूंचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर हळदीचे गरम दूध प्यायल्याने दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करून शांत झोप मिळण्यास मदत करतात.
  • आयुर्वेदानुसार हळदीचे दूध प्यायल्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.
  • हळद मिश्रित आरोग्यदायी दूध दूध पूर्णान्न आहे. त्यामुळे दुधात हळद मिसळल्यास आरोग्यास नक्कीच फायदा होतो. यास ‘गोल्डन मिल्क’ असे म्हणतात. याचे अनेक फायदे आहेत. गोल्डन मिल्कमध्ये हळद, आल्याची पूड, वेलची पूड मिसळतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध व इतर मसाल्यांचे पदार्थ मिसळून केलेला काढा अतिशय उपयुक्त आहे. साहित्य  एक लिटर दूध, १० ग्रॅम हळद, १०० ग्रॅम सेंद्रिय गूळ पावडर, ५० ग्रॅम जेष्ठमध पावडर कृती 

  • प्रथम एक लिटर दूध चांगले उकळून घ्यावे. जेणेकरून त्यामध्ये गूळ पावडर मिसळल्यावर फाटणार नाही. दूध चांगले उकळल्यानंतर त्यामध्ये १०० ग्रॅम गूळ पावडर मिसळावी. हे मिश्रण चांगले हलवून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये १० ग्रॅम हळद, ५० ग्रॅम जेष्ठमध पावडर मिसळावी.
  • हे सर्व मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवावे. जेणेकरून हळद, गूळ पावडर, जेष्ठमध पावडर या सर्वांचा अर्क दुधात चांगला मिसळला जाईल.
  • संपर्क : नेहा गोडसे, ९४२२११४१८६ अमृता राजोपाध्ये- कुलकर्णी, ७२१८३२७०१० (कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा चलाखी

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

    SCROLL FOR NEXT