watershed development work
watershed development work  
ग्रामविकास

जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल

Chandrakant Jadhav

 कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील ग्रामस्थ आणि पाणी फाउंडेशन यांच्या मदतीने मागील काही वर्षांमध्ये गावात जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. त्याचे दृश्‍य परिणाम गेल्या व यंदाच्या पावसाळ्यात दिसत असून, ३० टक्के शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेणे शक्य झाले आहे. कोळपांढरी हे गाव शहादा तालुका आणि  मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. मध्य प्रदेशातील पानसेमल आणि शहादा तालुक्यामधील मंदाणे गाव परिसर या गावापासून नजीक आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी हे गाव असून, १०० टक्के आदिवासी बांधव, शेतकरी या गावात आहेत. गावाचे क्षेत्र १६१ हेक्टर आहे. लोकसंख्या सुमारे ६०० आहे. पूर्वी फक्त खरिपात मका, मूग, उडीद आदी पिके घेणे शक्य होत होते. पावसात पाणी वाहून जायचे. ते थांबत नसल्याने किंवा त्याचा संचय होत नसल्याने पाणीटंचाई अनेकदा निर्माण व्हायची. पाऊस कमी झाला तर स्थिती आणखी बिकट बनायची. अशा स्थितीत ग्रामस्थ एकत्र आले.  राज्य शासनाच्या कृषी विभागातील वरिष्ठ कृषी अधिकारी कैलास मोते हे  याच गावातील आहेत. गावात जलसंधारणासाठी श्री.मोते यांनी पुढाकार घेतला आणि तांत्रिक मदत केली. पाणी फाउंडेशनचे गुणवंत पाटील यांनी जलसंधारणाच्या कामासंबंधी मार्गदर्शन केले. जल,मृद संधारणाचे आराखडे तयार केले. गावात २०१९ मध्ये सुमारे १५ लाख रुपये खर्चून १७ शेततळी, सीसीटी, डीप सीसीटी, कर्पाटमेंट बंडिंग, तलावातील गाळ काढणे आदी कामे घेण्यात आली. ग्रामस्थांनीदेखील सुमारे दीड लाख रुपयांची मदत केली. गेल्या पावसाळ्यातच शेततळ्यात पाण्याचा चांगला संचय झाल्याने एका शेतकऱ्याने मत्स्यपालन केले. यातून चार महिन्यात निव्वळ २० हजार रुपये नफा त्यांनी मिळविला.  जलसंधारणाच्या कामांसाठी सरपंच रमेश पावरा, बाबूलाल पावरा, कांतिलाल पावरा आदी अनेक शेतकरी, ग्रामस्थांनी मदत केली. सर्वांच्या सहभागामुळे कामे योग्य पद्धतीने झाली. यामुळे गावातील विहिरींची पाणीपातळी वाढली.  रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होवू लागले आहे. गेल्या वर्षी गावातील ३० टक्के शेतकऱ्यांनी खरिपानंतर रब्बीमध्ये हरभरा, मका लागवड केली होती. यंदाही मका, हरभरा या पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT