village planing
village planing 
ग्रामविकास

समजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प

डॉ. कैलास बवले

‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत ग्रामविकासाचे टप्पे समजाऊन घेतले. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक ग्रामस्थांनी गावाचा विकास आराखडा कसा तयार करावा याची विचारणा केली. म्हणूनच आजच्या भागांमध्ये आपण पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्पातील घटकांची माहिती घेत आहोत.

गावाच्या आर्थिक स्थितीबाबत आणि प्रत्यक्ष त्यातून विकास घडवून आणण्यासाठी दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, त्या म्हणजे गावाचा अर्थसंकल्प आणि गावाचा विकास आराखडा. गावाच्या शाश्‍वत विकासासाठी केवळ आर्थिक संसाधने पुरेशी नसतात, तर शाश्‍वत विकासासाठी त्या गावातच उपलब्ध असलेली नैसर्गिक व मानव संसाधनेही महत्त्वाची असतात. गावाच्या जल, जंगल व जमीन या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गावाच्या शाश्‍वत विकासासाठी जमिनीचे आरोग्य व उत्पादकता, पाण्याचे आरोग्य व कार्यक्षम व्यवस्थापन आणि वनांचे संरक्षण, संवर्धन याचा योग्य आराखडा तयार करणे ही प्रथम प्राधान्याची बाब आहे. त्यासाठी गावाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून ग्रामविकास आराखड्यात त्याचा अंतर्भाव करावा लागतो. अनुदान  ः   या प्रकारात जमीन महसूल, अनुदान, उपकर अनुदान, गौण खनिजे अनुदान, मुद्रांक शुल्क अनुदान, आदिवासी/मागासवर्गीय ग्रामपंचायत अनुदान, वित्त आयोग अनुदान ग्रामपंचायतीला मिळत असते. कर ः अनुदानाशिवाय दुसरा मार्ग म्हणजे कर. घरपट्टी, ठोक अंश दान, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, पाणीपट्टी, बाजारकर, करमणूक कर, सार्वजनिक जागेचा भोगवटा कर, विहीर-तलाव पाणीपट्टी, सुधार कर इत्यादी तर आकारणी ग्रामपंचायत करू शकते. इतर उत्पन्न ः उत्पन्नाचा तिसरा मार्ग म्हणजे इतर उत्पन्न. यामध्ये इमारत भाडे, जागा भाडे, कोंडवाडा फी व दंड, विक्रीचे उत्पन्न, दान, देणग्या, कर्ज, लोकवर्गणी, विशिष्ट योजनेसाठी अनुदान, दाखले, नक्कल फी. अशा प्रकारे गावाचे व खर्च याचे वार्षिक विवरण पत्रक म्हणजे अंदाजपत्रक हे गावाचे कामकाज आणि विकास दिशेचा आरसा असते.

ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प

ग्रामपंचायतीकडे सोपविलेल्या कामामध्ये प्रामुख्याने कृषिविकास, पशुसंवर्धन, वने आणि गायरान विकास, समाज कल्याण, शिक्षण व प्रौढ शिक्षण, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, आरोग्य इमारती, दळणवळण, लघू पाटबंधारे, जलव्यवस्थापन, ग्रामीण उद्योगधंदे, कुटीरोद्योग, स्वसंरक्षण, सहकाराची कामे, सामान्य प्रशासन, पिण्यासाठी पाणीपुरवठा यांचा समावेश होतो. या सर्व कामासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी विविध मार्गांनी ग्रामपंचायतीस हा पैसा मिळत असतो. त्यालाच ग्रामपंचायतीचे उत्पन्न असे म्हणतात. या सर्व कामावर खर्च होतो त्यास ग्रामपंचायतीचा वार्षिक खर्च म्हणतात. असे उत्पन्न व खर्चाचे वार्षिक विवरणपत्रक तयार केले जाते. त्यास ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प म्हणतात. ग्रामपंचायतीस कामे करण्यासाठी जे उत्पन्न हवे असते तो पैसा ग्रामपंचायतीस प्रमुख तीन मार्गांनी मिळतो. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीस सरकारकडून अनुदान मिळते., ग्रामपंचायत लोकांकडून कर वसूल करते आणि  ग्रामपंचायतीस इतर साधनांपासून उत्पन्न मिळते.

पुढील भागात आपण एका उदाहरणामध्ये गावाची अर्थव्यवस्था कशी आहे आणि गेल्या दहा वर्षात ग्रामअर्थव्यवस्था कशाप्रकारे सुधारली. हे त्या गावाच्या मागील दहा वर्षांच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून पहाणार आहोत.

-   डॉ. कैलास बवले, ८८८८८९२७५७ (समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT